Latest News

6/recent/ticker-posts

भादा येथे नॅशनल लेवल मॉनिटरिंग(NLM) पथकाची भेट 

भादा येथे नॅशनल लेवल मॉनिटरिंग(NLM) पथकाची भेट 



लातूर:(जिल्हा प्रतिनिधी बी.जी.शेख)दि.२ - औसा तालुक्यातील भादा येथे केंद्र सरकारच्या योजनेच्या कामाची पाहणी करण्यासाठी इं एल एम पथकाची भेट देण्यात आली. केंद्र शासनाचा होणारा जनतेवरील आणि नागरिका वरील निधी योग्यरित्या खर्च होतो किंवा नाही हे पाहण्यासाठी सोमवार दिनांक 2 नोव्हेंबर 2020 रोजी सकाळी 10 वा भादा येथे एन एल एम या पथकाने भेट दिली यावेळी यामध्ये सा.सिंचन विहिर,बिहार पॅटर्न वृक्ष लागवड, प्रधानमंत्री आवास योजना, शौचालय, शोषखड्डे, व नरेगा अंतर्गत सर्व कामाची अभिलेखे, ग्रामपंचायत अभिलेखे यांची पाहणी केली. तसेच नरेगा अंतर्गत काम केलेल्या मजुरांशी चर्चा व श्रावणबाळ,निराधार योजनेच्या लाभधारक यांचेशी पथकाने प्रत्यक्ष लाभार्थीशी चर्चा केली.यावेळी जि. प. समन्वयक संजय मोरे, तहसिलदार श्रीमती शोभा पुजारी,नायब तहसीलदार सुभाष कानडे,बालविकास अधिकारी किशोर गोरे,कुंभकर्ण, स. गटविकास अधिकारी सतिष पाटील,गट शिक्षण अधिकारी मॅडम, उपअभियंता बसपुरे,विस्तार अधिकारी (पंचायत) बालाजी पोतदार, बालाजी तेलंग,सहाय्यक कार्यक्रम अधिकारी साहेबराव सोनकांबळे,जोतिर्लिंग चिखले,ग्राम विकास अधिकारी माणिक सूर्यवंशी, उपसरपंच बालाजी शिंदे, ग्रामरोजगार सेवक बी डी उबाळे,तांत्रिक अधिकारी संपत माने,विलास शिंदे,रोहित देशमुख,गिरदावर पटेल,तलाठी दुधभाते,बचत गट महिला, गावातील नागरिक उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments