Latest News

6/recent/ticker-posts

ते आले शाळा बघीतले आणी भारावुन गेले !

ते आले शाळा बघीतले आणी भारावुन गेले !



भादा प्रशालेला केंद्र शासनाच्या पथकाची भेट


{बाबुराव आगलावे}


भादा लातूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात असलेली जि. प. कन्या व प्रशाला भादा या प्रशालेत केंद्र शासनाचे पथक प्रमुख सुनील कुमार एस. पी. यांचे पाऊल पडताच त्यांनी आनंदाने भारावून गेले. नॅशनल लेव्हल मॉनिटर सुनील कुमार एस. पी. यांचे स्वागत दोन्ही प्रशालेचे मुख्याध्यापक रमेश अनंतवार यांनी केले तर त्यांच्या सोबत आलेले नोडल ऑफिसर संजय मोरे यांचे स्वागत बालाजीराव शिंदे यांनी केले. सहाय्यक गटविकास अधिकारी पाटील,यांचे स्वागत मोहन माकने यांनी केले.केंद्र शासनाचे ग्रामीण विकास मंत्रालयाच्या वतीने सुनील कुमार एस. पी यांचे पथक हे केंद्र शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची पाहणी करून मूल्यमापन करण्यासाठी लातूर जिल्ह्यातील जि. प. कन्या व प्रशाला भादा येथे भेट दिली. प्रशालेतील विविध उपक्रमाची माहिती डॉ. नागेश पाटील यांनी सांगितली तर श्रीमती अनिता खडके यांनी विद्यार्थिनीने लिहिलेला कोविड वर आधारीत काव्यसंग्रह दाखविला.श्रीमती साधना मंठाळे यांचेही सहकार्य त्यांना लाभले. केंद्र शासनाचे पथक प्रशालेस भेट दिल्यामुळे दोन्ही प्रशालेचे मुख्याध्यापक रमेश अनंतवार यांनी शाळेची माहिती सांगून पथकाचे आभार व्यक्त केले. प्रशालेच्या आवारात पथक प्रमुख सुनील कुमार एस. पी. यांच्या हस्ते अशोक व आंबा वृक्षारोपण करण्यात आले. प्रशालेच्या आवारातील वृक्षाची पाहणी केली व शाळेच्या परिसराची पाहणी केली. शाळेतील उपक्रम व स्वच्छतेबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. दोन्ही प्रशालेचे मुख्याध्यापक रमेश अनंतवार व सर्व शिक्षकांचे त्यांनी कौतुक केले.याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अर्जुन लटूरे, सदस्य, बालाजीराव शिंदे, सहाय्यक गटविकास अधिकारी पाटील, गटशिक्षणाधिकारी श्रीमती भंडारी व अन्य कर्मचारी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments