रेल्वे दिल्लीत..शिट्टी गल्लीत
रेल्वे एकदाची धावू द्या..
आम्हाला धूर तरी पाहू द्या..
दोघे आपसात भांडण्यापेक्षा
तुमचा विकास तरी दिसू द्या..
आमच्या पिढीत सर्व्हे सुरू झाला
नातवाच्या पिढीत रेल्वे धावेल..
राजकारण असेच सुरू राहिले तर
आमचा देव कर्नाटकाला पावेल..
एकाने विकासाची बुलेट ट्रेन चालवावे
एकाने विकासाचा पायलट व्हावे..
दोघांनी आपसात झगडण्यापेक्षा
विकासाचे साक्षीदार व्हावे..
दोघांच्या भांडणात लोण्याचा गोळा
तिसऱ्याच्या घशात जातो..
तुम्ही राहता असेच बाजूला
तिसरा पिठावर रेघोट्या मारतो..
रेल्वे मार्ग ठरवण्या अगोदर
तुम्ही आपसात भांडू नका..
दिल्लीतली रेल्वे धावण्या अगोदर
गल्लीत शिट्टी वाजवू नका..
संजय जेवरीकर(ज्येष्ठ पत्रकार)


0 Comments