औसा मार्गे रेल्वे जावी यासाठी रेल्वे संघर्ष समितीची स्थापना
लातूर(प्रतिनिधी बी.जी.शेख) दि.२९ - मागील अनेक दिवसांपासून औसा शहरातुन रेल्वे जावी या विषयाचा प्रश्न उपस्थित झाला आहे.लातूर ते गुलबर्गा रेल्वेचा प्रस्ताव मागील अनेक दिवसांपासून प्रलंबित होता. तो पूर्ण करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. माजी आमदार बसवराज पाटील यांनी ही रेल्वे औसा मार्गे जाण्याचा प्रस्ताव शासन दरबारी दाखल केला होता. मात्र रेल्वे अशी सरळ न घेऊन जाता ही लातूर _निलंगा व गुलबर्गा या मार्गे घेऊन जाण्याचा अट्टाहास काही नेते मंडळी कडून होत आहे. या रेल्वे संबंधी पाहणी दौरे सुरु झाले. तेव्हा शहरात राजकीय वातावरण तापू लागले.एकमेकावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न स्थानिक नेते मंडळी कडून झाला.औसा नगरीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष अफसर शेख यांनी रेल्वे मंत्री गोयल यांना पत्र पाठवून ही रेल्वे औसा मार्गे घेऊन जाण्याची मागणी केली. तेव्हा त्यानी आमदारांनी गल्लीचा विचार न करता त्यांच्या पक्षाचे असलेल्या सरकार कडे या रेल्वे चा मार्ग औसा शहरातुन घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करण्याचे सूतोवाच वेगवेगळ्या माध्यमातून केले. विद्यमान आमदार अभिमन्यु पवार यांनीदेखील यासंबंधी रेल्वेमंत्र्यांना पत्र पाठवून व प्रत्यक्ष फोनवर बोलून आपली मागणी मांडली. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी आमदारांना भेटण्याचे वचन दिले व आपल्या मागणीचा विचार केला जाईल असे सांगितले. या विषयाला घेऊन शहरामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर एकत्र येऊन संघर्ष समितीची स्थापना केली व येणाऱ्या काळामध्ये ही रेल्वे शहरातून जावी यासाठी तीव्र आंदोलन करण्याचे सांगितले. लातुर- गुलबर्गा रेल्वे औसा मार्गाने मंजुरी द्या या मागणी चा पाठपुरवठा करन्या साठी आज दि.२९ औसा येथे विविध सामाजिक,राजकिय,पञकार श्रेञातील मान्यवरा ची बैठक होऊन औसा तालुका रेल्वे हक्क संघर्ष समिती ची स्थापना झाली व पुढिल आंदोलन ची दिशा ठरविन्यात आली आहे. ही संघर्ष समिती आमदार अभिमन्यू पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे ज्येष्ठ पत्रकार राजू पाटील यांनी यावेळी सांगितले.बैठकीला खुंदमिर मुल्ला, आकाश पाटिल ,अँड शाहनवाज पटेल, गणेश माडजे, दिपक चाबुक सवार, अभयसिंह बिसेन ,सय्यद मुजफरअली इनामदार, राजु पाटिल, अँड समियोद्दिन पटेल , राजु कसबे,अँड सचिन मिटकरी,गोपाळ धानुरे, माजीद काजी , जयराज कसबे, शादाब हन्नुरे, अँड फय्याज पटेल, नवाब खादर ,बाबा पटेल, इलियास चौधरी, पाशा शेख , मिशबा पटेल अँड राजु पटेल, नियामत लोहारे , इत्यादी उपस्थित होते.

0 Comments