भादा पोलिस ठाण्यात सुविधांची कमतरता नऊ महिन्यानंतर झाली कार्याची पूर्तता
औसा:(शहर प्रतिनिधी)दि.२९ - औसा तालुक्यातील भादा हे पोलिस ठाण्याचे गाव असल्याने या ठाण्यावर 24 तास सेवा बजावणारे कर्मचारी मुक्कामी असतात यामुळे या ठाण्यामध्ये भादा ग्रामपंचायत कडून सुविधांचा अभाव होत होता तो नऊ महिन्यानंतर पूर्ण झाल्याची भावना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेश मुळे यांनी व्यक्त केली. पोलीस ठाण्यांमध्ये गेल्या नऊ महिन्यापासून विद्युत पुरवठा आणि पाण्याची सुविधा नव्हती यामुळे भादा या ठिकाणी मुक्कामी राहण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांची गैरसोय होत होती यामुळे या ठिकाणी कोणीही राहण्यास धजावत नव्हते कारण रात्री लाईट नको आणि पाण्याची व्यवस्था नको यामुळे हात पंपावरून पाणी आणण्याची वेळ त्या कर्मचाऱ्यावर होती ती आता भादाचे प्रशासक जयंत जाधव,ग्रामविकास अधिकारी माणिक सूर्यवंशी यांच्याकडे बालाजी शिंदे माजी सरपंच यांनी पाठपुरावा करून सदरील ठाण्यातील गैरसोय दूर केली आणि या ठिकाणी नवीन पंप टाकण्यात आला आहे यामुळे पाण्याची टंचाई दूर झाली आहे आणि लाईटची व्यवस्था केली यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले तर बसविलेल्या नवीन पंपाची पूजा सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मुळीक यांच्या हस्ते ते करण्यात आली यावेळी माजी सरपंच बालाजी शिंदे,हेड कॉन्स्टेबल देव चव्हाण,सूर्यप्रकाश गिरी पोलीस नाईक चव्हाण, क्षीरसागर,पत्रकार बालाजी दे उबाळे,भादेकर भूमिपुत्र आदी उपस्थित होते.

0 Comments