"मराठी अस्मितेचा इशारा"वृत्तपत्राच्या दिवाळी विशेषांकांचे प्रकाशन सोहळा उत्साहात
निलंगा:(तालुका प्रतिनिधी/इरफान शेख) दि. ३० नोंहेबर वार सोमवार रोजी "मराठी अस्मितेचा इशारा" वृत्तपत्राच्या दिवाळी विशेषांकांचे प्रकाशन उपविभागीय अधिकारी,निलंगा मा.श्री.विकास माने सर यांचे शुभहस्ते पार पडला.
या दिवाळी विशेषांकात "कोरोना" विषयी सविस्तर माहिती चे लेख असल्यामुळे या "मराठी अस्मितेचा इशारा" विशेषांकांचे उपजिल्हाधिकारी मा.श्री.विकास माने यांनी कौतुक केले. यावेळी "मराठी अस्मितेचा इशारा" समूहाची तापडिया यांनी सर्व संपादकीय मंडळातील व्यक्तींचे व तालुक्याच्या प्रतिनिधींची तसेच इतर मान्यवरांची ओळख करून दिली.
या कार्यक्रमाला "मराठी अस्मितेचा इशारा" वृत्तपत्राचे संपादक के.वाय. पटवेकर, जिल्हा प्रतिनिधी बी.जी. शेख, सागर तापडिया, ऍड. अरुण पाटील, निलंगा प्रतिनिधी इरफान शेख, गोपाळ जाधव, राम राठोड, बी.डी.उबाळे, प्रभूदास पोतदार, राम पौळे व "मराठी अस्मितेचा इशारा" परिवारातील सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर तापडिया यांनी केले तर आभार प्रदर्शन निलंगा प्रतिनिधी इरफान शेख यांनी केले.
0 Comments