वंचित बहुजन आघाडी देवणी तालुका च्या वतीने शोकसभा
देवणी (शहर प्रतिनिधी/विक्रम गायकवाड) देवणी तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष सदाशिव भिंगे यांचे कार अपघातात दुःखद निधन झाले. त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून देवणी तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी शोक सभा घेऊन भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. भैय्यासाहेब देवणीकर, देविदास बोंबळीकर, उद्धव तवडे, आनंद कांबळे, धनराज बनसोडे, भावेश लासुरे, सतीश कांबळे, धनाजी कांबळे, रवींद्र बनसोडे, रत्नदीप गायकवाड, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments