महिलांनी आत्मनीरभरपणे पुढे यावे- महानंदा भोजने
देवणी:(प्रतिनिधी/विक्रम गायकवाड ) ग्रामीण महिला विकास संस्था देवणी च्या वतीने व स्वीसएड पुणे यांच्या सहकार्याने दिनांक 25 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर 2020 या कालावधीत महिला हिंसाचार विरोधी पंधरवडा देवणी तालुक्यातील 20 गावातून राबवला जात आहे. दिवसान दिवस महिलावरील हिंसाचाराच्या घटना मध्ये वाढ होत आहे. या हिंसा थांबवण्यासाठी गावपातळीवर जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने युवक-युवती महिला नवविवाहित दांपत्य यांच्यासोबत विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. याचाच भाग म्हणून स्वाक्षरी मोहीम , महिला सोबत बैठका, भिंती रंगविणे, नवदांपत्या सोबत समुपदेशन प्रशिक्षण, अशा कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. आज दिनांक 01 डिसेंबर 2020 रोजी देवनी(खुर्द ) येथे महिला हिंसाचार विरोधी पंधरवड्याच्या निमित्ताने नवदाम्पत्याची समुपदेशन व युवक-युवती साठी हुंडा घेणार नाही, हुंडा देणार नाही, हुंडाला विरोध करीन, बालविवाह करणार नाही, बालविवाहाला विरोध करीन, अशा प्रकारची शपथ देऊन. स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आले. व या कायॆक्रमाला नवविवाहित जोडपे म्हणून भीम उत्तमगिरी गिरी, राधा भीम गिरी, रोहिदास ज्योतिबा पाटील सावित्र रोहिदास पाटील ,रवींद्र किशन रणदिवे, वर्षा रवींद्र रणदिवे, छान राव मुराळे, मीना छानराव मोराळे, लक्ष्मण रणदिवे, सरोजा लक्ष्मण रणदिवे, हे जोडपे उपस्थित होते. हा पंधरवडा यशस्वी करण्यासाठी कुषावर्ता बेळे ताई, कचराताई गायकवाड,राधाकृष्ण देशमुख, कृष्णा इंगोले, विकास बिरादार, केरनाथ कांबळे, महानंदा भोजने, सरोजा शिंदे, विजयश्री बोचरे, गाव पातळीवरील प्रेरक छानराव मुराळे, प्रेरिका मनिषा बिरादार, यांनी केले.

0 Comments