उपजिल्हा रुग्णालयात एच.आय.व्ही / एड्स जनजागृती शपथ कार्यक्रम संपन्न
निलंगा:(शहर प्रतिनिधी/इरफान शेख)1 डिसेंबर जागतिक एड्स दिनानिमित्त आज दि.02/12/2020 रोजी उपजिल्हा रुग्णालय, निलंगा येते एचआयव्ही / एड्स जनजागृती विषयी शपथ घेण्यात आली व मातेकडून होणाऱ्या एच आय व्ही / एड्स संसर्गपासून प्रतिबंध / उपाय व एच आय व्ही / एड्स प्रतिबंधामध्ये समाजाची भूमिका महत्वाची असून जागतिक एकता सामायिक जबाबदारी समाजातील सर्व घटकाची याबद्दलचे मार्गदर्शन करण्यात आले व जिल्हा अंतर्गत एचआयव्ही / एड्स कार्यक्रमाची सोयी सुविधांची माहिती देण्यात आली. वैद्यकीय अधिक्षक डॉ.दिलीप सौंदळे यांच्या अध्यक्षतेखाली विविध कार्यक्रमाचे आयोजन 1 ते 31 डिसेंबर या कालावधीत मध्ये कोविड-19 च्या सूचनांचे पालन करून करण्यात येणार आहे. एच आय व्ही / एड्स बाबत व्यापक जनजागृती मोहिमेमध्ये जास्तीत जास्त युवकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात आले. आपली एचआयव्ही ची स्तिथी जाणून घेण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयात आय.सी.टी.सी मध्ये येऊन ( रु.नं.26 ) एचआयव्ही तपासणी करून घ्यावी आपल्या मनातील शंका- कुशंका बाबत टोल फ्री 1097 या क्रमांकावर फोन करून महिती उपलब्ध करून घ्यावी असे अवाहन वैद्यकीय अधिक्षक डॉ.दिलीप सौंदळे यांनी केले. यावेळी डॉ.सोळुंके , डॉ.पाटील , डॉ.कोडगी , डॉ.पिसाळ , डॉ.शेख , डॉ.पाटील मँडम , डॉ.चव्हाण मँडम , पांडुरंग नागिमे , गोपाळ जाधव ,मनोज बरमदे, मुजीब नासरजंग , कदम भाऊ , राहुल , श्री.विलास जाधव , डेपे सर ,लक्ष्मण फुलसुंदर , अजय कांबळे , विजय घाडगे , श्रीमती भाग्यश्री काळे , अंजुम सौदागर , मुल्ला यास्मिन ,कल्यानी होनमुटे , शिवानी राजगिरे , रीना डुमलवाड , मीना ऊसनाळे , संध्या लोंढे , श्रीमती हणमंते , मायादेवी पवार , श्रीमती कोकाटे व उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन समुपदेशक अमजदखान पठाण , श्रीमती सिंधू जाधव , प्र.शा.तंत्रज्ञ श्रीमती लोंढे व श्रीमती कुडके यांनी केले

0 Comments