चाकुरातील भाजपा,मनसे,वंचीत आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा कॉंग्रेस मधे प्रवेश
माजी सरपंच गंगाधर केराळे,माजी सरपंच सिताराम मोठेराव यांचा कॉग्रेस प्रवेश
चाकुर:{ता.प्र.सलीमभाई तांबोळी} शहरातील भाजपा,वंचित,मनसे या राजकिय पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराजजी पाटील चाकूरकर, राज्याचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख,पालकमंत्री नामदार अमित देशमुख,आमदार धीरज देशमुख यांच्या नेतृत्वाखाली विश्वास ठेवून कॉंग्रेस पक्षात बुधवारी कॉंग्रेस भवन लातूर येथे जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे यांच्या उपस्तीत्तित प्रवेश केला असुन प्रवेश करनार्यात चाकुरचे माजी सरपंच गंगाधर केराळे व सिताराम मोठेराव यांचा समावेश आहे या प्रवेश केलेल्या सर्वाचे कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कॉंग्रेसमधे सन्मान केला जाईल- श्रीशैल्य उटगे यावेळी बोलताना श्रीशैल्य उटगे यांनी प्रवेश केलेल्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ता यांचा कॉंग्रेस मधे सन्मान करुन प्रतेकाला न्याय देण्याचा प्रयत्न नेते कॉंग्रेस पक्ष करेल असा विश्वास त्यानी व्यक्त करुन सर्वांचे मनापासून स्वागत केले. यावेळी चाकुर तालुका कॉंग्रेस अध्यक्ष विलासराव पाटील यांनी माजी गृहमंत्री शिवराजजी पाटील चाकूरकर,माजी मंत्री दिलीपराव देशमुख, पालकमंत्री अमित देशमुख, शैलेश पाटील चाकूरकर,आ.धिरज देशमुख, यांच्या नेतृत्वाखाली चाकुर मधिल भाजपा,मनसे ,वंचित आघाडिचे पदाधिकारी यानी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केल्याबद्दल आभार व्यक्त केले यावेळी कॉंग्रेस भवन येथे झालेल्या प्रवेश सोहळ्यास जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष श्रीशैल्य उटगे,चाकुर तालुका अध्यक्ष विलास पाटिल,जिल्हा अल्पसंख्याक कॉंग्रेस अध्यक्ष सय्यद रफिक,जिल्हा कॉंग्रेस माध्यम समन्वयक हरिराम कुलकर्णी,जिल्हा कॉंग्रेस सोशल मेडिया अध्यक्ष प्रविण सुर्यवंशी,सचिन दाताळ,मारुती पांडे,सोनू डगवाले, सय्यद मुर्तुजा चाकुर शहर अध्यक्ष,भागवत फुले, साजीद लखनगावे,गफूर मासुलदार, सुरेश मुंडे,रियाज पठाण खदीर शेख, बाळू ईरवाने, सलीम तांबोळी, प्रकाश पटणे, सुभाष मोठेराव, अनिल शेंके,धोंडीराम शेटे, काशिनाथ बुकटे,शेख शाकिर, संतोष जोशी, सुधाकर पताळे, हे उपस्थित होते. यावेळी कॉंग्रेस मधे प्रवेश करणाऱ्यांत गंगाधर कराळे माजी सरपंच चाकूर, सिताराम मोठेराव माजी सरपंच चाकूर, लक्ष्मण केराळे माजी ग्रामपंचायत सदस्य, नागनाथ उर्फ बाबुराव शेटे,धोंडीराम पौळकर, योगेश भोसले, मनोज सोमवंशी, शंकर मोरे, गोविंद झांबरे, सुनील मोरे, संतोष धोंडगे,सचिन माने, दत्ता झांबरे, विजय पाडमुखे, प्रवीण गायकवाड, महेश वागलगावे, कदम सौदागर सिद्धार्थ महालिंगे, आकाश मोठेराव,ढोलगे दिलीप,शेख इस्माईल,अजहर शेख, परमेश्वर गुंडरे, सतिष गायकवाड, किशोर भालेराव मोरे सुनील, जाधव विठ्ठल, नागनाथ केराळे, संतोष केराळे, गणेश केराळे,आदी यांचा समावेश आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.ओमप्रकाश झुरळे यानी केले तर आभार प्रदर्शन प्रविण सुर्यवंशी यानी मानले.

0 Comments