Latest News

6/recent/ticker-posts

जाकीर सामाजिक संस्थेच्या मदतीमुळे वाचले मनोरुग्णाचे प्राण

जाकीर सामाजिक संस्थेच्या मदतीमुळे वाचले मनोरुग्णाचे प्राण

निलंगा:(शहर प्रतिनिधी/इरफान शेख) औराद बिदर रोडवर गेल्या तीन दिवसांपासून आशा थंडीच्या दिवसात अगदी बेवारसासारखे पडलेल्या एका मनोरुग्नाला जाकीर सामाजिक संस्थेच्या वतीने निलंगा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले  गेल्या तीन दिवसांपासून थंडीच्या दिवसात कुडकुडत एक बेवारसासारखे मनोरुग्ण रोडच्या कडेला पडलेलं असल्याचे माहिती पत्रकार सलमान पठाण यांनी सामाजीक कार्यकर्ते जाकीर शेख यांना दिली लागलीच जाकीर शेख त्यांचे सहकारी लखन लोंढे, कृष्णा पळसे यांनी पोलीस प्रशासनाच्या कर्मचारी सहित घटनास्थळी गेले असता अगदी एखादी वस्तू फेकल्या सारखे,थंडीपासून वाचण्यासाठी पोते गुंडाळून घेऊन पडलेली व्यक्ती आढळून आली लागलीच त्याला उचलून घेऊन पाणी पाजवून अंबुलन्स बोलावून डॉ.कदम यांच्याकडे उपजिल्हा रुग्णालय निलंगा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून जाकीर सामाजिक संस्थाच्या वतीने अगदी बस स्टँड चक्क दत्तक घेऊन स्वच्छता अभियान राबवलेलं असेल,किंवा गेल्या वर्षी थंडीच्या दिवसात निलंगा बस स्टँड मध्ये चादरी वाटप केलेलं सामाजिक काम असेल त्यानंतर लॉक डाउन मध्ये गरजूंना अनेक राशन किट वाटप असेल अशा अनेक सामाजिक उपक्रम सतत राबविण्यात येत असल्याने जाकीर शेख व त्यांच्या टीमचे कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments