भादा येथील ग्रामदैवत खंडोबा यात्रा रद्द ग्रामपंचायत-यात्रा कमिटीचा महत्वपूर्ण निर्णय
औसा:( जिल्हा प्रतिनिधी/बी.जी.शेख) औसा तालुक्यातील भादा येथील खंडोबा यात्रा रद्द करण्याचा निर्णय ग्रामपंचायत आणि खंडोबा यात्रा कमिटीने घेतला आहे. गेल्या अनेक वर्षाची परंपरा असलेला हा ग्रामदैवत खंडोबा यात्रा उत्सव यावर्षी खंडोबा यात्रा उत्सव यावर्षी covid-19 या जागतिक महामारी च्या भीतीपोटी येथील होणारी चंपाषष्टी निमित्त होणारी दि 19 डिसेंम्बर ते 21 डिसेंम्बर रोजीची होणारी खंडोबा यात्रा गुरुवार दि 3 डिसेंम्बर रोजीच्या बैठकीमध्ये रद्द करण्यात आली आहे. भादा येथील ग्रामपंचायतमध्ये झालेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय ग्रामपंचायत आणि यात्रा कमिटीच्या वतीने घेण्यात आला यावेळी माजी उपसरपंच बालाजी शिंदे,ग्रामविकास अधिकारी माणिक सूर्यवंशी,तंटामुक्त समिती अध्यक्ष सूर्यकांत पाटील,ग्राम दैवत यात्रा-उत्सव कमिटीचे अध्यक्ष जन्मेजय गायकवाड,भीमाशंकर पाटील,माजी सरपंच पांडुरंग कात्रे,रुपसेन डोलारे,अशोक गाडेकर,भागवत गायकवाड आदी उपस्थित होते.

0 Comments