चाकूर येथे जागतिक दिव्यांग दीन साजरा
चाकुर:{ता.प्र.सलीमभाई तांबोळी} निवासी अंपग कार्यशाळा चाकूर व निवासी अंपग विद्यालय चाकूर येथे जि. लातूर येथे जागतिक दिव्यांग दीन साजरा करण्यात आला. येथील श्री गणेश शिक्षण प्रसारक मंडळ मांडुरकी व्दारा संचलीत निवासी अपंग कार्याशाळा व विद्यालय झरी रोड चाकुर येथे तीन डिसेंबर जागतिक दिव्यांग दिन निमित्त चाकुर तालुक्यातील सामाजिक कार्यात अग्रेसर राहणाऱ्या दिव्यांग बांधविचा सत्कार करुन दिव्यांग दिन साजरा करण्यात आला, ०३ डिसेंबर २०२० जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला. दिव्यांग दिनानिमित्त संस्थेच्या कोषाध्यक्ष सौ.मिनाताई देवकते यांच्या हस्ते या गावातील दिव्यांग सामाजिक कार्यकर्ते राजू कसबे, मसुरे राजरत्न, घोरपडे सतिश, अमोल बालक्षाफ., व मामा इंदाळे यांचा शाल, , हार घालून सत्कार करण्यात आला, व फळ वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला.या बांधवाचा सुरेश हाके पाटील यांच्या शुभहस्ते शाल,हार देऊन सत्कार करण्यात आला.सर्व दिव्यांग बांधवाना अल्पअपहार व फळ वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रम यशस्वीते साठी शाळेचे शेख इलियास इसाक,सौ.कोबन वंदना,काळगे शंकर,टाळकुटे विठ्ठल,पार्वती वाघमारे,या सह सर्व कर्मचारी उपस्थित होते,सदर कार्यक्रम सामाजिक अंतर राखुन घेण्यात आले.

0 Comments