Latest News

6/recent/ticker-posts

विक्रम गायकवाड यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आ) देवणी तालुका शहर अध्यक्षपदी निवड

विक्रम गायकवाड यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आ) देवणी तालुका शहर अध्यक्षपदी निवड 

देवणी:{प्रतिनिधी} रिपब्लिकन पार्टि आॕफ इंडिया (आठवले) देवणी शहराध्यक्षपदी विक्रम भगवान गायकवाड यांची निवड करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रिपाइं(आ) राज्य सचिव चंद्रकांत दादा चिकटे,रिपाइं(आ)लातूर जिल्हा अध्यक्ष देवीदासजी कांबळे साहेब,रिपाइं(आ)लातूर जिल्हा उपाध्यक्ष अंकुश भाऊ ढेरे,तसेच लातूर जिल्ह्यातील रिपाइं(आ) चे देवणी तालुका अध्यक्ष विलास वाघमारे  निलंगा तालुका अध्यक्ष, संदीप कांबळे,जळकोट तालुका अध्यक्ष विनोद कांबळे, शिऊरअनंतपाळ तालुका अध्यक्ष मधुकर कांबळे,रेणापूर तालुका अध्यक्ष धम्मानंद घोडके , देवणी तालुका युवा अध्यक्ष व लातूर जिल्हा आयटी सेल चे उपाध्यक्ष गणेश भाऊ कांबळे, ग्रामीण तालुकाध्यक्ष रोहित डोंगरे , निळकंठ डोंगरे आदी मान्यवर उपस्थित होते.  यावेळी विक्रम भगवान गायकवाड यांची  रिपाई आ राज्य सचिव चंद्रकांत दादा  चिकटे व लातूर जिल्हाध्यक्ष देविदास कांबळे तसेच लातूर जिल्हा उपाध्यक्ष अंकुश भाऊ ढेरे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र  देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला . सर्वत्र देवणी तालुक्यात विक्रम गायकवाड यांचे अभिनंदन होत आहे .

Post a Comment

0 Comments