Latest News

6/recent/ticker-posts

औसा शहरातील हाश्मी चौकात दररोज होतो चक्काजाम;कायमस्वरूपी वाहतूक पोलीसाची आवश्यकता

औसा शहरातील हाश्मी चौकात दररोज होतो चक्काजाम;कायमस्वरूपी वाहतूक पोलीसाची आवश्यकता


लातूर:(प्रतिनिधी बी.जी.शेख)दि.२० - औसा शहरातील मुख्य चौकांमध्ये हाश्मी चौक असल्याने दिवसातून अनेक वेळा वाहनांची गर्दी होऊन चक्काजाम होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहे. ही समस्या मागील अनेक वर्षापासून असल्याने याठिकाणी कायमस्वरूपी वाहतूक पोलीसाची नियुक्ती आवश्यक आहे. फक्त संध्याकाळच्या वेळेला दोन कर्मचारी या ठिकाणी उभे राहून वाहनांची शिस्त लावण्याचा निकामी प्रयत्न करत असताना दिसून येतात.मात्र दिवसभरात याठिकाणी छोटे-मोठे अपघात वाढल्याने कायमस्वरूपी वाहतूक पोलिस दिल्यास अपघात कमी होतील व वाहनांना शिस्त लागेल. याठिकाणी पूर्वी पोलीस चौकी होती मात्र ती नसल्याने खाजगी वाहन वाले व जवळ असलेल्या दुकानदारांचे अतिक्रमण वाढल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण होऊन चक्काजाम होत असल्याचे चित्र नेहमी दिसत आहे.

Post a Comment

0 Comments