घंटा गाडीचा लोकार्पण ना. संजय बनसोडे यांच्या शुभहस्ते
चाकुर:{ता.प्र.सलीमभाई तांबोळी}ग्रामपंचायत अलगरवाडीने जिल्हा स्मार्ट ग्राम पुरस्कार निधी अंतर्गत घेतलेल्या घंटा गाडीचा लोकार्पण कार्यक्रम दिपावली पाडवा च्या शुभमुहुर्मतावर महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता, पर्यावरण राज्यमंञी ना. संजयजी बनसोडे यांच्या हस्ते पार पडला. याप्रसंगी लातुर जिल्हा मध्य. सह. बँकेचे माजी व्हा.चेअरमेन विठ्ठलराव माकणे, आदर्श सरपंच गोविंदराव माकणे व ग्रामसेवक प्रशांत राजे उपस्थित होते. तसेच याच शुभमुहुर्तावर घंटा गाडीचा शुभारंभ सोलापूर महानगर पालिकेचे उपायुक्त धनराज पांडे यांच्या शुभहस्ते सायंकाळी पार पडला. यावेळी सर्व दैनिकांचे तालुका प्रतिनिधी व जेष्ठ पञकारांच्या उपस्थितीत पार पडला. याप्रसंगी सरपंच गोविंदराव माकणे, उपसरपंच सौ. अनुजा संगमेश्वर पटणे, ग्रामसेवक प्रशांता राजे, ग्रा.पं. सदस्य सौ. उषा रामेश्वर पाटील, राम सांगवे, सिद्राम होनमणे, पोलिस पाटील रमाकांत ढोबळे यांच्यासह डाॕ. गुरुनाथ सांगवे, नागनाथ पटणे यांच्यासह गावातील नागरिक बहुसंख्येने उपस्थितत होते. याप्रसंगी उपायुक्त धनराज पांडे यांनी अलगरवाडी गाव हे महाराष्ट्रातील एक आदर्श गाव असुन गावाचा आदर्श इतर गावांनी घ्यावा असा मनोदय व्यक्त केला.

0 Comments