Latest News

6/recent/ticker-posts

सोमवार पासून होणार शाळा सुरू;पालकात संभ्रमावस्था


सोमवार पासून होणार शाळा सुरू;पालकात संभ्रमावस्था

लातूर:(प्रतिनिधी/बी.जी.शेख)महाराष्ट्रात 23 नोव्हेंबर पासून शाळा सुरू होणार आहेत. यासाठी शाळांना पत्र पाठवून सर्व पूर्वतयारी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामध्ये शाळेतील शिक्षकांचे कोरोणा तपासणी करून घेण्यात येणार आहे. शाळेतील शिक्षकांनी आपली कोरोना चाचणी करून घेतली आहे. शाळा सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या बाबींमध्ये विद्यार्थ्यांच्या पालकांची संमती आवश्यक आहे.शिक्षकांनी स्वतःची कोरोना चाचणी करुन घेतली असली तरी विद्यार्थ्यांचे काय ? हा प्रश्न अनुत्तरित आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम झाल्यास त्याला शाळा व्यवस्थापनाची कसलीही जबाबदारी असणार नाही. असे असल्याने सध्या तरी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवावे की नाही या संभ्रमावस्थेत पालक असल्याचे दिसत आहे. विद्यार्थ्यांमध्ये सोशल डिस्टंसिंग चे पालन होईल असे वाटत नसल्याने पालक आपल्या पाल्यांना शाळेत पाठवणार नसल्याचे अनेक पालकांनी बोलून दाखवले आहे. शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती 50% झाल्यास ज्या शाळांमध्ये पूर्वीपासून बसण्याची योग्य व्यवस्था नाही,अशा शाळांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. विद्यार्थ्यांची तपासणी केली नसल्याने विद्यार्थ्यांना झालेल्या कोरोनाची लागन शिक्षकांना होणार नाही हे कसे ठरवले गेले? असे अनेक प्रश्न उपस्थित होत असल्याने शासन आपला निर्णय मागे घेईल का? असा प्रश्न शिक्षक व पालकांना पडला आहे.

Post a Comment

0 Comments