चाकुर तालुक्याती ग्रामपंचायत सरपंच पदांच्या आरक्षण सोडत
नळेगाव,जानवळ,आटोळा,गावचे सरपंचपद खुल्या प्रवर्गासाठ
चाकुर:{ता.प्र.सलीमभाई तांबोळी} चाकुर तालुक्यातील ७१ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण काढण्यात आले असुन यात नळेगांव,जानवळ,आटोळा,यासह ३६ गावातील सरपंच पद खुल्या प्रवर्गासाठी सुटले असुन उर्वरीत गावातील १४ गावातील अनुसुचित जाती,१९ जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग २जागा आनुसुचित जमातीसाठी आरक्षित झाले आहेत. चाकुर शहरातील यशवंत मगंल कार्यालयात गुरुवारी दि.१९ दुपारी ३ वाजता अहमदपुरचे उपविभागीय अधिकारी जीवन देसाई ,चाकुर तहसिलदार डॉ.शिवानंद बिडवे,यांनी आरक्षण जाहीर केले.आरक्षण सोडत पुढील प्रमाणे *अनुसुचित जाती* लातुररोड,महांडोळ,महाळंग्रा,रोहिणा,शिवणी मंजरा,वडवळ नागनाथ *आनुसुचित जाती महिला* अजनसोंडा [खु] बनसावरगाव,बोळेगांव,घरणी,मोहानाळ,शिवनखेड,सुगाव, *खुल्या प्रवर्गासाठी* आनंदवाडी,अजनसोंडा [बु], आष्टा,आटोळा,बेलगाव,बोथी,देवंग्रा,डोंग्रज,हिंपळनेर,जानवळ,जढाळा,लिंबाळवाडी,मष्णेरवाडी,मोहदळ,नागदरवाडी,नळेगांव,वाघोली,झरी [खु] *खुला प्रवर्ग महिला* भाटसांगवी,ब्रम्हवाडी [ए], घारोळा,हाडोळी,हाळी [खु] जगळपुर, कबनसांगवी,कडमुळी,कवठाळी,महाळग्रांवाडी,नागेशवाडी,नायगांव,नांदगाव,राचन्नावाडी,रायवाडी,टाकळगांव, तिवघाळ,झरी [बु] *नागरिकांचा मागास प्रवर्ग* बाबलगाव,बोरगांव,ब्रम्हवाडी [व] चापोली,गांजुर,कलकोटी,मुरंबी,रामवाडी,शिरनाळ,तिर्थवाडी, *नागरिकांचा मागास प्रवर्ग माहिला* अलगरवाडी,अंबुलगा,दापक्याळ,गांजुरवाडी,केंद्रेवाडी,मांडुरकी,शेळगांव,तिवटघाळ,उजळंब, *अनुसुचित जमाती* हणमंत जवळगा *अनुसुचित जमाती* वडगाव एक्की, ही गावे आरक्षीत झाली आहेत.आरक्षण सोडती नायब तहसिलदार बालाजी चितळे,शेषेराव टीप्परसे,प्रकाश धुमाळ,विस्तार अधिकारी एकनाथ बुआ,चाकुर सज्जा तलाठी नवनाथ खंदाडे,महेश राठोड,अंगद कासले,विलास क्षीरसागर,विठ्ठल शिंदे,नागेश तेलंगे,गणेश चिंतनपल्ले,यांनी सहकार्य केले. चाकुर तालुक्यातील २४ ग्रामपंचायतीची मुदत जुलै महिन्यात संपली असुन कोरोनामुळे या गावात निवडणूक झालेली नाही.या गावातील सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाले असुन कांही दिवसात या गावात निवडणूक होणार असल्यामुळे इच्छुक कार्यकर्ते निवडणूकीच्या कामाला लागले आहेत.चाकुर तालुक्यातील केंद्रेवाडी,महाळंगी,हाडोळी,झरी [बु] शेळगांव,राचन्नावाडी,टाकळगाव,बोरगाव,महाळंग्रा,नागेशवाडी,रोहीणा,उजळंब,कबनसांगवी,बावलगांव,नळेगांव, लिंबाडवाडी,महाळंग्रावाडी, यागावात निवडणुका होणार आहेत.

0 Comments