Latest News

6/recent/ticker-posts

येलमवाडी-निलंगा बहीण भावाचा पाण्यात पडून मुत्यू

येलमवाडी-निलंगा बहीण भावाचा पाण्यात पडून मुत्यू



निलंगा:(शहर प्रतिनिधी/इरफान शेख) तालुक्यातील येलमवाडी गावात अतिशय दुर्दैवी घटना घडली येलमवाडी ( ता.निलंगा ) येथून जाणाऱ्या निम्न तेरणा प्रकल्पाच्या उजव्या कालव्याच्या भरावसाठी शासनाने पाडलेल्या खड्यात जनावरे राखण्यासाठी गेलेल्या 2 चिमुकल्या बहीण भावाचा मुत्यू झाला या दुर्दैवी घटनेमुळे पूर्ण गावात शोककळा पसरली आहे व हळहळ व्यक्त केली जात आहे. शाळा सुरू नसल्याने गावाकडील मुले आई वडिलांना शेतातील कामात शक्य तेवढी मदत करत आहेत त्याचप्रमाणे निलंगा तालुक्यातील येलमवाडी गावातील पूजा विजय राजे ( वर्ष -11 ) व कृष्णा विजय राजे ( वर्ष - 9 ) हे दोघे बहीण भाऊ जनावरे राखण्यासाठी गेले असता कृष्णा पाण्यात गेलेल्या जनावरे हाकण्यासाठी गेला असता पाय घसरून पाण्यात पडला आणि बुडू लागला ते बहीनेने बघितले तिने पण भावाला वाचवण्यासाठी पाण्यात उडी घातली दोघांनाही पोहता येत नसल्याने दोघांचाही पाण्यात पडून दुर्दैवी मुत्यू झाला मात्र काळाने त्या बहीण भावावर घात घातला.


Post a Comment

0 Comments