तीनशे कुटुंबांसोबत दिवाळी साजरी करून गावाला घंटागाडीचे लोकार्पण.
अलगरवाडी हे गाव संपूर्ण महाराष्ट्र मध्ये मॉडेल म्हणून उभा टाकेल असा विश्वास - धनराज पांडे
चाकूर:(ता.प्र. सलीमभाई तांबोळी) तालुक्यातील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेल्या अलगरवाडी चे सरपंच गोविंदराव माकणे यांनी 300 उंबऱ्याच्या गावातील कुटुंबासोबत दिवाळी उत्साहात साजरी करून पाडव्याचा शुभ मुहूर्त साधून गावाला घंटागाडीचे लोकार्पण करण्यात आले. त्याप्रसंगी सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त धनराज पांडे यांनी गावाला गावपण देणारे सरपंच म्हणजेच माकणे असे उदगार काढून सबंध महाराष्ट्रामध्ये अलगरवाडी हे गाव मॉडेल म्हणून उभा राहील असा विश्वास व्यक्त केला. सबंध भारत देशामध्येच कोरोना सारख्या महामारी च्या काळात अलगरवाडी येथील काही कुटुंब ही परेशान तर होतेच त्यामध्येच समोर आली ती दिवाळी प्रत्येक कुटुंब रोजचा उदरनिर्वाह भागवण्यासाठी परेशान असतानाच दिवाळीसारखा मोठा सण समोर आला आणि डोळ्यासमोर प्रश्न निर्माण झाला तो म्हणजे दिवाळी सण साजरा कसा करायचा पण या गावचे सरपंच गोविंद माकणे फार मोठ्या मनाचे त्यांनी गावातील प्रत्येक कुटुंबाला बुंदी सह फराळाची व्यवस्था घरपोच करून दिली आणि काही जणांचा तरी प्रश्न जो डोळ्यासमोर उभा होता तो आनंदमयी या सरपंचांनी सोडवला आणि या आनंदा सोबतच माझी दिवाळी साजरी झाली असे सरपंच माकणे यांनी उदगार काढले. त्यासोबतच आज दीपावलीच्या पाडव्याच्या शुभ मुहूर्त साधून जिल्हा स्मार्ट ग्राम पुरस्कार निधी अंतर्गत अलगरवाडी गावातील कचरा जमा करण्यासाठी घंटागाडीचे याप्रसंगी लोकार्पण करण्यात आले. त्याप्रसंगी प्रमुख उपस्थिती उपसरपंच अनुजा पटणे व ग्रामपंचायत सदस्य उषा पाटील, प्रशांत शेटे, संगमेश्वर जनगावे ,संग्राम वाघमारे ,सलीम तांबोळी, सुधाकर हेमनर, चेतन होलदांडगे, ओम लोया, सुशिल वाघमारे, यांच्यासह अलगरवाडी येथील रमाकांत ढोबळे ,मारुती माकणे, गुरुनाथ सांगवे, संगमेश्वर पटणे, सुनील ढोबळे, सिद्धाराम होनमाने, नागनाथ पटणे , त्रिंबक स्वामी,निवृत्ती घुमे यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रशांत राजे यांनी केले तर आभार विकास स्वामी यांनी मानले.
0 Comments