Latest News

6/recent/ticker-posts

महिंद्रा होम फायनांसची सक्त वसुली थांबवावी-रिपब्लिकन सेना लातुर

महिंद्रा होम फायनांसची सक्त वसुली थांबवावी-रिपब्लिकन सेना लातुर



देवणी(प्रतिनिधी) संपुर्ण देशामध्ये कोविड-19 च्या महामारी मुळे जवळ जवळ 8 महिण्या पासुन काम धंदे बंद आहेत. यामुळे सर्व सामान्य जनता परेशान आसुन जगणे मुस्किल झाले आहे.महिंद्रा होम फायनांस सह ईतर लोन देणा-या कंपण्या कडुन सर्व सामान्य जनतेनी लोन घेतले आहे.सर्व सुरळीत चालु असतानां कोविड-19 मुळे सर्वांचे 8 महिन्यापासुन काम बंद असल्यामुळे जनता परेशान आहे.आता कुठे कामाची सुरूवात झाली आहे.लगेच महिंद्रा होम फायनांसच्या वसुली प्रतिनिधीने सक्त वसुली चालु केली आहे.कर्जाचा हफ्ता भरा अन्यत: घराच्या बाहेर निघा,घरातील भांडे बाहेर फेकने ,घरांना कुलुप लावतो म्हणुन ठान मांडुन बसने,जामीनदारच्या घरी जावुन ठान मांडुन बसने,जामिनदार नसल्यास त्याच्या पत्नीला अफिसला आलच पाहिजे म्हणुन गोंधळ घालणे असे प्रकार चालु असल्यामुळे जनता या प्रतिनिधिनां वैतागली आहे.तरी ही सर्व फायनांस कंपण्यांची सक्त वसुली थांबवावी या मागणीचे निवेदन रिपब्लिकन सेनेच्या वतीने देवणी तहसिलदारा मार्फत मुख्यमंत्री व जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे.या निवेदनांवर जिल्हाध्यक्ष प्रा.नरसिंग सुर्यवंशी आनंदवाडीकर,दिलीप शिंदे,लक्षमण रणदिवे,शकिल मणियार, विक्रम गायकवाड,आंगद गायकवाड,विठ्ठल गायकवाड ईत्यादिंच्या स्वाक्ष-या आहेत.


Post a Comment

0 Comments