45 व्या राष्ट्रीय योगसन स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसादात सुरवात
जळगाव:(प्रतिनिधी/आनंदकुमार ब्राह्मणे) सर्व खेळ कोरोनाच्या काळात बंद असले तरी योग फेडरेशन आँफ ईंडिया कडून योग स्पर्धा या जिल्हा, राज्य, व राष्ट्रीय स्तरावर आँन लाईन लाईव्ह उस्फुर्त प्रतिसादात सुरु आहेत ह्या स्पर्धेत प्रत्येक वयोगटातुन 1300 स्पर्धकांनी भाग घेतला आहे. जळगावचे 10 ते 12 वयोगटात नंदिनी दुसाने, 14 ते 16 स्नेहल वाणी व 30 वर्षावरील वयोगटात रुद्राणी देवरे प्रतिनिधित्व करणार आहेत. सर्व स्पर्धकांना महाराष्ट्र योग असोसिएशनच्या अध्यक्ष व आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक डॉ अनिता पाटील, जळगाव जिल्हा हौशी योग असोसिएशन चे अध्यक्ष किशोर पाटील, जळगाव जिल्हा ईंटरनँशनल नँचरोपँथी आँरगनायझेशनचे अध्यक्ष सतिश देशमुख यांनी शुभेच्छा दिल्या.
0 Comments