देवणी तालुक्यात ग्रामपंचायत साठी 78 .49% टक्के मतदान
देवणी:(शहर प्रतिनिधी/विक्रम गायकवाड) तालुक्यातील 33 ग्रामपंचायत मधील 105 मतदान केंद्रावर 78 टक्के इतके मतदान झाले आहे. 33 गावातील एकुण मतदार संख्या 44 हजार 585 इतके असून यापैकी 34 हजार 998 इतक्या मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. बजावलेल्या मतदानात पुरुष मतदारांची संख्याही 18646 इतकी आहे तर स्त्री मतदारांची संख्याही 16352 इतकी आहे. स्त्री व पुरुष यांची एकूण मतदानाची टक्केवारी ही 78 .49% इतकी असल्याची माहिती देवणीचे तहसीलदार सुरेश घोळवे यांनी दिली.

0 Comments