औसा तालुक्यात ग्रा.प. साठी सरासरी 79 टक्के मतदान
औसा:(तालुका प्रतिनिधी/बी.डी.उबाळे) दि. - 15 जानेवारी 2021 रोजी औसा तालुक्यातील 45 ग्रामपंचायतींसाठी सरासरी 79 टक्के मतदान झाले असून 160 मतदान केंद्रावर शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली आहे. औसा तालुक्यातील उजनी,टाका, लामजना, व लोदगा, ही चार गावे संवेदनशील असल्याने या ठिकाणी प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. उजनी, लामजना, भादा,खरोसा, नगरसोगा, तपसे चिंचोली, मंगरूळ,तळणी, मोगरगा,कार्ला, सत्तरधरवाडी आदि मोठ्या ग्रामपंचायतीचा ह्या टप्प्यातील निवडणुकीत समावेश होता. यावेळी ग्राम पंचायत निवडणुकीत 45 हजार 719 पुरुष 39 हजार 130 महिला अशा एकूण 85 हजार 543 मतदारांचा समावेश असून दुपारी 3.30 पर्यंत 30 हजार 538 पुरुष आणि 27 हजार 945 महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. ग्रामपंचायतीसाठी तालुक्यात मतदानासाठी मतदारात उत्साहा दिसून येत होता. अनेक गावात मतदारांनी रांगेत उभे राहून शांततेत मतदान केले. शेतातील कामाचे दिवस आसल्याने दुपारी 12 पर्यंत मतदानाचा वेग अधीक होता. कुठलाही अनुचित प्रकार न घडता 160 मतदान केंद्रावर शांततेत मतदान प्रक्रिया संपन्न झाली असून सोमवार दिनांक 18 जानेवारी 2021 रोजी ग्रामपंचायत निवडणुकीचे मतमोजणी प्रशासकीय इमारत औसा येथे होणार असल्याची माहिती तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी शोभा पुजारी यांनी दिली.
0 Comments