Latest News

6/recent/ticker-posts

निलंगा तालुक्यातील रामलिंग मुद्गगड येथे अज्ञात रोगाने एकापाठोपाठ 9 शेळ्या दगावल्याने पशुधन चिंतेत

निलंगा तालुक्यातील रामलिंग मुद्गगड येथे अज्ञात रोगाने एकापाठोपाठ 9 शेळ्या दगावल्याने पशुधन चिंतेत



निलंगा: बळीराजा कायमच शेतीला जोडधंदा म्हणून कुक्कुटपालन आणि शेळीपालनाचा व्यवसाय करत आला आहे. अनेक तरुण शेतकरी दिवसेंदिवस हा व्यवसाय वाढवत आहेत मात्र, बर्डफ्लूने कुक्कुटपालन व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे. त्यातच आता शेळ्याही अज्ञात रोगाने बळी पडत असल्याचे समोर आल्याने पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. निलंगा तालुक्यातील रामलिंग मुदगड येथील एका शेतकऱ्याच्या 9 शेळ्यांचा अचानक मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. कोंबड्या पाठोपाठ आता शेळ्या दगावत असल्याने पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे. शेतकरी मधुकर बेळंबे यांच्या नऊ शेळ्या काल संध्याकाळी एकामागोमाग एक आशा 9 शेळ्या दगावत गेल्या. त्यांच्या नऊ शेळ्या अवघ्या काही तासात मृत्युमुखी पडल्यामुळे यात त्यांचे 1 लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. तहसीलदार गणेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी व मंडळ अधिकारी यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. शेळ्या नेमक्या कोणत्या कारणामुळे दगावल्या आहेत याची माहिती अद्याप समोर आली नाही. जिल्ह्यातील तीन तालुक्यात बर्ड फ्लूचा संसर्ग वाढलेलं असताना अचानकपणे शेळ्या दगावत असल्याने संभ्रमाचे वातावरण तयार झाले आहे.

Post a Comment

0 Comments