Latest News

6/recent/ticker-posts

शेतकऱ्यांना दिवसा व योग्य दाबाने वीजपुरवठा करा आणि तालुक्यातील नादुरुस्त रोहित्र दुरुस्त करा

शेतकऱ्यांना दिवसा व योग्य दाबाने वीजपुरवठा करा आणि तालुक्यातील नादुरुस्त रोहित्र दुरुस्त करा


मनसेचे निलंगा महावितरण ला निवेदन

निलंगा:(तालुका प्रतिनिधी/इरफान शेख) निलंगा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सर्वच वीजपंपाना रात्री ऐवजी दिवसा वीजपुरवठा द्यावा व तो कमी दाबाचा न देता योग्य दाबाने द्यावा जेणेकरून पिकाला योग्य पाणीपुरवठा करता येईल व तालुक्यातील नादुरुस्त रोहित्र दुरुस्त करून घ्यावे या मागण्यांचे निवेदन मनसे जिल्हाध्यक्ष डॉ नरसिंह भिकाणे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.रात्रीच्या काळ्याकुट्ट अंधारातही जीवघेणी थंडी असतानाही आपले प्राण मुठीत घेऊन शेतकरी पिकाला पाणी देण्यासाठी विजेची वाट बघतो व वीज आल्यावर पिकांना पाणी देतो. महावितरण शेतकऱ्यांच्या जीवाची पर्वा न करता फक्त रात्री वीज पूववठा कसे करू शकतो? त्यातही अनेक ठिकाणी विजेचा दाब कमी ठेवते जेणेकरून पंप चालयलाच नको! मग शेतकऱ्यांनी पाणी कशे द्यावे असा प्रश्न मनसेने निवेदनात उपस्थित केला आहे. तसेच तालुक्यात अनेक ठिकाणी रोहित्र नादुरुस्त आहेत ते ही दुरुस्त करणे अत्यंत गरजेचे आहे. स्वातंत्र्योत्तर काळात एकही वेळेस मेंटेनन्स च्या नावाखाली पोलदुरुस्ती केलेली दिसत नाही. वाकलेले पोल, झुकलेल्या जीवघेण्या तारा, उघडे रोहित्र अशी गंभीर व जीवघेणी अवस्था महावितरण ची जिल्हाभर दिसते. या सर्व बाबींच्या दुरुस्तीची व अंमलबजावणी ची मागणी मनसेने महावितरण अभियंत्या कडे केली आहे.

रात्री वीजपुरवठा करत असाल तर वीजबिल अर्धे द्या- डॉ भिकाणे

महावितरण मनमानी पणाने शेतीपंपासाठी रात्री वीजपुरवठा करणार असेल तर हे नियमबाह्य असल्याने  त्या शेतकऱ्याना महावितरण ने अर्धे वीजबिल द्यावे असे जिल्हाध्यक्ष डॉ भिकाणे म्हणाले. तसेच शेतकऱ्यांच्या जीविताला रात्रीच्या अंधारात शेतातील सापांपासून,प्राण्यांपासून व विजेच्या धक्यापासून धोका असल्यामुळे महावितरण ने मोफत विमा काढून द्यावा जेणेकरून महावितरण च्या अवेळी वीजपुरवठयाने शेतकऱ्यांच्या जीविताला धोका झाला तर त्याच्या परिवाराला विमाकंपनी कडून मदत होईल अशीही मागणी डॉ भिकाणे यांनी अभियंत्याकडे केली. अन्यथा मनसे तीव्र आंदोलन करेल असा इशारा मनसेने दिला आहे. या निवेदनावर तालुकाध्यक्ष सूरज पटेल,नजीर मुजावर,जाकीर शेख,गणेश उसनाळे आदींसह कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Post a Comment

0 Comments