Latest News

6/recent/ticker-posts

एस डी पी एल कंपनीच्या लेखी आश्वासन पत्रामुळे केळगावचे धरणे आंदोलन तूर्तास मागे प्रशासनाची साक्ष

एस डी पी एल कंपनीच्या लेखी आश्वासन पत्रामुळे केळगावचे धरणे आंदोलन तूर्तास मागे प्रशासनाची साक्ष 


केळगाव:(प्रतिनिधी/वसीम मुजावर) निलंगा तालुक्यातील केळगाव येथे कालपासून गावातील आडूळ शिवारातील तलावाचे खोलीकरण व्हावे व गावातील पाण्याचा प्रश्न कायम मिटावा यासाठी  एस डी पी एल यांनी खोलीकरण काम करून द्यावे या मागणीसाठी केळगाव येथेल पाणी फाउंडेशन व ग्रामस्थांच्या वतीने धरणे आंदोलनास सुरुवात झाली होती त्याची दखल घेत आज रविवारी मंडळ अधिकारी कांबळे केळगाव तलाठी बी ए चव्हाण हे आज सकाळी 11:00 वाजता केळगाव पाटीवर उपोषण जागी शिंदे डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी भेट देऊन आंदोलनकर्यांच्या मागण्या मान्य करून कंपनीने लेखी आश्वासन पत्र दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले आहे.


तलावाचे खोलीकरण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असे केळगाव ग्रामपंचायत नूतन सदस्य सुधाकर चव्हाण,भंम्पू चव्हाण यांनी सांगितले आंदोलन यशस्वी बनण्यासाठी आनंत काळे ,पद्माकर पेठकर ,राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुकाध्यक्ष दिलीप काळे, दत्तात्रय काळे ,राजकुमार राठोडकर ,मच्छिंद्र काळे, जहांगीर शेख ,संजय चव्हाण ,वसंत राठोड ,बंडू आडे, बालाजी कांबळे, प्रमोद कुलकर्णी ,उद्धव राठोड ,नारायण मुंजाळे,माधव कांबळे, अफसर पटेल,जगन सूर्यवंशी,दीपक पाटील,सुभाष कांबळे यांनी आंदोलनास समर्थन दिले असून गावकऱ्यांनी हे त्याला सकारात्मक भूमिका घेत सहकार्य केली आहे. सदरील डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड. कंपनीच्या लेखी आश्वासन पत्रामुळे व मंडळ अधिकारी तलाठी यांच्या यांच्या साक्षीने मागे घेऊन टाळ्या वाजून  आभार मानण्यात आले.

Post a Comment

0 Comments