Latest News

6/recent/ticker-posts

चाकूरात पल्स पोलिओ लसिकरणाला चांगला प्रतिसाद

चाकूरात पल्स पोलिओ लसिकरणाला चांगला प्रतिसाद


चाकूर:(ता.प्र.सलीमभाई तांबोळी) चाकूर शहरात पल्स पोलिओ राष्ट्रीय लसिकरणाला चांगला प्रतिसाद मिळाला. शहरातील अंगणवाडी क्रमांक आठ व आठरा या ठिकाणी पल्स पोलिओ चा डोस सौ शितल लोया यांच्या हस्ते यशश्री ओमप्रकाश लोया या बालकाला देऊन सुरूवात करण्यात आली. शासनाच्या आदेशावरूण शशक्त व निरोगी समाजासाठी आरोग्य महत्वाचे आहे पोलिओ मोहीम हि जिरो ते पाच या वयोगटातील सर्व लहान बालकांसाठी असुन पोलिओचा डोस देऊन समुळ उच्चाटन होने गरजेचे आहे. पल्स पोलिओ मोहीम यशस्वी करण्यासाठी आरोग्य कर्मचारी संगिता हिप्पाळे, अंगणवाडी कार्यकर्ती, सुमन काळे, गंगासागर काटवटे, आशा कार्यकर्ती, लता कोरनुळे यांनी प्रयत्न केले.

Post a Comment

0 Comments