Latest News

6/recent/ticker-posts

योगा सर्टिफिकेशन बोर्ड परीक्षेत ओमकार गादगे यांचे यश

योगा सर्टिफिकेशन बोर्ड परीक्षेत ओमकार गादगे यांचे यश


चाकूर
:(ता.प्रतिनिधी/सलीमभाई तांबोळी) आजच्या अत्यंत धकाधकीच्या जीवनामध्ये माणसाला मनोबल व शरीरस्वास्थ्य राखणे अत्यंत आवश्यक आहे. आणि योगसाधनेने हे शक्य आहे, हीच बाब जाणून चाकूर येथील ओंकार शिवलिंग गादगे यांनी शैक्षणिक दृष्ट्या योग निवडला. ओरिसा राज्यातील कटक येथील श्री श्री विश्वविद्यालयातून योगा पदवीधर शिक्षण घेतले व सध्या स्वामी विवेकानंद योगा विश्वविद्यालयात  पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत. आणि आयुष मंत्रालय भारत सरकार व पतंजली योग पीठ हरिद्वार यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक मान्यताप्राप्त घेण्यात आलेल्या योगा सर्टिफिकेशन बोर्ड ' YCB LEAVE 3 ( Yoga Teacher and Evaluator ) परीक्षा मध्ये उत्तम यश संपादन केले आहे. या यशाबद्दल रुलर अँड अर्बन योगा असोसिएशन, लातूरचे के.वाय. पटवेकर, पत्रकार सतीश तांदळे, सलीम भाई तांबोळी, डॉ मधुसूदन चेरेकर, अमर वाघमारे, धनंजय बिबराळे, विरेश अंगाडी आदीने अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments