औसा- भादा शेतशिवारात भरली शेतीशाळा
शेतक-यांनी मिळाले रब्बी पिकावरील किडनियंत्रनाचे मार्गदर्शन
{ बाबुराव आगलावे }
औसा तालुक्यातील भादा येथील शेतशिवारात महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागा अंतर्गत उन्नत शेती संमृद्ध शेतकरी मोहिमे अंतर्गत आज शेतीशाळा घेण्यात आली. यात शेतक-यांनी रब्बी ज्वारीवरील किड नियंत्रनाबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी शिवरत्न शेतकरी बतत गटातील शेतकरी व शिवारातील काही शेतकरी उपस्थित होते. त्यांना कृषी सहाय्यक पी. एस. लोखंडे व कंदले ए. पी. यांनी रब्बी ज्वारी व किडनियंत्रन या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी शेतकरी दयानंद पाटील , अक्षय पाटील, शिवरत्न शेतकरी बचत गटाचे अध्यक्ष चैतन्य पाटील, उमाकांत पाटील, चंद्रकांत पाटील, भागवत बनसोडे, सलीम सावकार, विशाल पाटील, वैजीनाथ पाटील, संतोष स्वामी, अनिल ऊबाळे, चाँद खोजे व असंख्य देवानंद पाटील व असंख्य शेतकरी उपस्थित होते. या शेती शाळेच्या शेवटी चैतन्य पाटील यांनी उपस्थित शेतकऱयांचे आभार मानले.

0 Comments