तलाव ठेका समिती सभेचे 4 फेब्रुवारी रोजी आयोजन
लातूर:(जिमाका) दि. 28 - जिल्हयातील 500 हेक्टर खालील जलक्षेत्राचे पाटबंधारे तलाव लातूर जिल्हयातील मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थे अंतर्गत (बोली) जाहीर लिलाव पध्दतीने ठेक्याने देणे साठी दिनांक 4 फेब्रुवारी 2021 रोजी दुपारी ठिक 3.00 वाजता सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, लातूर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय तलाव ठेका समिती सभेचे आयोजन त्याच्या दालनात केले आहे.
या सभेमध्ये लातूर जिल्हयातील पाटबंधारे तलाव जाहीर लिलाव पध्दतीने ठेक्याने देण्याबाबत कार्यवाही प्रस्तावीत आहे.लिलावातील तलावाचे नाव, न्युनतम ठेका रक्कम, तलाव ठेका सुरक्षा अनामत रक्कम व वार्षीक इष्टतम मत्स्यबोटुकली संचयन किंमतीच्या 10 टक्के रक्कम तसेच अटी व शर्ती सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय ,लातूर यांच्या कार्यालयात (सुट्टीचे दिवस वगळून) कार्यालयीन वेळेत पाहण्यास मिळतील. तरी पात्र संस्थांनी बोली प्रक्रियेत भाग घ्यावा असे जाहीर आवाहन करण्यात येत आहे.
भाग घेणाऱ्या मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांना शासन निर्णय,अटी व शर्ती नुसार आवश्यक कागदपत्रांची पुर्तता दिनांक 4 फेब्रुवारी 2021 रोजी दुपारी 12.00 वाजेपर्यंत सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, लातूर या कार्यालयास सादर करावे असे सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय,लातूर यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.

0 Comments