Latest News

6/recent/ticker-posts

वीजबिल माफीसाठी एम आय एम कडून बोंबा बोंब मारो आंदोलन

वीजबिल माफीसाठी एम आय एम कडून बोंबा बोंब मारो आंदोलन



औसा:(ता.प्रतिनिधी/बी डी उबाळे) लॉकडाउन काळामध्ये औसा तालुक्यात नागरिकांना जीवन जगणे महत्वाचे होते आणि या काळात कोणतेही काम नसल्याने हजारो कुटुंबावर उपासमारीची वेळ आली होती त्यामुळे या काळातील संपूर्ण वीजबिल माफ करण्यात यावी या मागणीसाठी औसा एम आय एम कडून बोंबा बोंब आंदोलन शुक्रवार दि 29 जानेवारी 2021रोजी सकाळी 11;00वा करण्यात येणार आहे.

 कारण प्रशासनास सतत वीज बिल माफीसाठी निवेदने आणि मागणी करूनही  तहसीलदार किंवा महावितरण अधिकारी यांनी कोणतीही कारवाई करण्यात आली नाही आणि वीज बिल माफीसाठी कोणतेही मार्ग दिसत नसल्याने आता हे अनोखे असे बोंबा बोंब आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन औसा तहसीलदार  आणि औसा पोलीस ठाणे यांना सादर करण्यात आले आहे. यावेळी या निवेदनावर एम आय एम नेते अँड. गफ्रुल्ला हाश्मी आणि मुजफ्फरअली इनामदार यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Post a Comment

0 Comments