Latest News

6/recent/ticker-posts

केळगाव ग्रामपंचायतीत काँग्रेसचा सुपडा साफ; भाजपचे वर्चस्व

केळगाव ग्रामपंचायतीत काँग्रेसचा सुपडा साफ; भाजपचे वर्चस्व  



भाजपचे 8 तर अपक्ष महाविकास आघाडीचे 3 उमेदवार विजयी

केळगाव:(वसीम मुजावर) निलंगा तालुक्यातील केळगाव येथील ग्रामपंचायत ही मागील 40 वर्षात एक अपवाद वगळता काँग्रेसचा दबदबा कायम राहिला होता. परंतु काँग्रेस पक्षांतर्गत पडलेल्या दुफळीमुळे व एकाधिकारशाहीमुळे पक्षात दुफळी निर्माण होऊन विद्यमान सरपंच शकील पांढरे यांनी व नाराज कार्यकर्त्यांनी अपक्ष महाविकास आघाडी असे वेगळे प्यानल बनून लढल्याने त्यात भाजपची वाट सोपी झाली. त्यामुळे काँग्रेस पक्षाला 11 उमेद्वारापैकी एकही जागी खाते उघडता आले नाही त्यामुळे काँग्रेसचा धुरळा उडून सुपडा साफ झाला तर शकिल पांढरे  यांच्या विभक्त महाविकास आघाडी प्यानालने वार्ड क्र 1 व वार्ड क्र 4 च्या  सहा जागा लढवत 3 जागेवर विजय मिळवीला आहे. तर उर्वरित भाजप पक्षाने तीन प्रभागावर पूर्ण बहुमताने 8 जागा निवडून आणल्या आहेत. अनेक दशकानंतर काँग्रेसला धक्का देत भाजपने आपली सत्ता आणली आहे. त्यामुळे तालुक्यात उलट सुलट गमतीदार चर्चा चांगलीच रंगली आहे.11 जागा लढवनाऱ्या काँग्रेस प्यानलला एकही जागा जिंकता आली नाही याचा अर्थ पक्षाला आत्मचिंतानाची गरज आहे असे जाणकार म्हणत आहेत. निवडुन आलेले 11 उमेदवार खालीलप्रमाणे आहेत प्रभाग एक मध्ये सुधाकर वैजनाथ चव्हाण,ज्योती धोंडीराम चव्हाण,रुक्मिनबाई निवृत्ती काळे प्रभाग दोन दीपक मधुकरराव पाटील,कांबळे कोंडाबाई सुभाष,राठोड आहिल्या शिवाजी प्रभाग तीन वैभव विजयकुमार पाटील ,शीतल छत्रघून काळे, प्रभाग चार शाहीन शकील पांढरे,रंजना प्रकाश सूर्यवंशी,सूर्यकांत धोंडिबा सूर्यवंशी असे केळगाव ग्रामपंचायतीवर 11 उमेदवार निवडून आले असून भाजप11 पैकी 8 जगावर मजल मारत बहुमताने सत्येत आली आहे.तर कोणत्याही  पक्षाचा वापर न करता व आधार न घेता अपक्ष जागा लढवत 6 पैकी 3 जागेवर यश मिळवलेल्या शकील पांढरे यांचे गावात चांगलेच कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0 Comments