गावक-यांची सेवा करताना त्याचीही होती कर्तृत्वाची एक डायरी !
रस्त्यावरचे खड्डे भुजवत-भुजवतच 'तो ' चढला ग्रामपंचायतची पायरी !!
भादा:(बाबुराव आगलावे) ज्यांचे इरादे पक्के असतात आणी स्वत:च्या कर्तृत्वावर अचाट आत्मविश्वास असतो अशी माणसे एक दिवस नक्कीच आपली ध्येय साध्य करतात याचाच प्रत्यय भादा ग्रामपंचायतच्या निवडणुकीच्या निमित्ताने गावक-यांना आला असुन गावक-याची सेवा करता करताच त्या ध्येयवेड्या तरुणाने ट्राय अगेन करत करतच ग्रामपंचायत गाठली आहे.
त्याच्या या यशाबद्दल तरुणाईत जोश आणी जल्लोश बघायला मिळत आहे.
भादा येथील उच्च्य शिक्षित तरुण अमोल रामेश्वर पाटील हे गेल्या अनेक दिवसा पासुन या ना त्या प्रकारे गावक-याच्या अडी अडचणी सोडवत असत. गेल्या काही वर्षात त्यांनी शेतातील कुपनलिकेच्या माध्यमातुन भर उन्हाळ्यात गावक-याची तहान ही भागवली आहे. एवढेच नव्हे तर गावात उन्हाळ्यात सुरू झालेल्या भिषन पाणी टंचाईवर मात करण्यासाठी स्वत:कडे कुठलही पद नसताना स्वखर्चातून एक कुपनलिका ही घेतली होती. पण करणा-याच्या माघं संकटं हजार म्हणल्या सारखं दुरदैवानं त्याला पाणी लागले नाही. तरीही निराश न होता गावापासुन साधारण एक किमी. भादा ते वरवडा रस्त्यावर पडलेले खड्डे स्वखर्चाने भुजवुन या भागातील शेतक-यांनी रस्त्यावरील होणारा त्रास त्यांनी कमी केला. भादा प्रशालेतही शालेय व्यवस्थापन समितीवर असताना अनेक चांगले निर्णय घेतले व त्याची अंमल बजावणी केली. त्यानंतर ओघानेच राजकारणात एन्ट्री करत सौ बार गिरुंगा फिर भी उसी पहाड पे फिरुंगा म्हणत काल झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत अखेर विजय संपादन केलाच . या पुढील काळात गावातील विद्यार्थ्यांच्या दर्जेदार शिक्षणासाठी एक मोठी चळवळ उभारण्याचा लवकरच श्री गणेशा करणार असल्याचे त्यांनी इशा-याशी बोलताना सांगितले. शेतकरी पुत्राच्या या राजकिय ओपनिंगला अनेक मित्र परिवाराकडुन शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

0 Comments