Latest News

6/recent/ticker-posts

मॅट्रिकपुर्व विविध शिष्यवृत्ती प्रस्ताव 30 जानेवारी पर्यंत सादर करावे

मॅट्रिकपुर्व विविध शिष्यवृत्ती प्रस्ताव 30 जानेवारी पर्यंत सादर करावे



लातूर:(जिमाका) दि.20 सन 2020-21 करीता मॅट्रिकपुर्व शिष्यवृत्ती मंजूरीसाठी विद्यार्थी उपस्थिती 75 टक्के पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे, परंतू शाळा सुरु नसल्यामुळे विद्यार्थ्यांची उपस्थिती नसली तरी ऑनलाईन शिक्षणाबाबत शिक्षण विभागाकडून कार्यवाही सुरु असल्यामुळे विद्यार्थ्यांची उपस्थिती ग्राहय धरावे किंवा कसे याबाबत मार्गदर्शन मागविले होते. तसेच सन 2020-21 या शैक्षणिक वर्षात मॅट्रिकपुर्व शिष्यवृत्ती  कार्यपध्दती ऑनलाईन किंवा ऑफलाईन पध्दतीने राबविण्यातबाबत मार्गदर्शन होण्यास विनंती केली होती.

आयुक्त्‍ समाज कल्याण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी शालेय शिक्षण विभागाने साथरोग प्रतिबंधक कायदा-1987 व आपत्ती व्यवस्थापन कायदा-2002 अंतर्गत दिनांक 15 जून 2020 च्या शासन परिपत्रकान्वये मार्गदर्शक सुचना विहीत केले असल्याने व त्यामध्ये शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना घरात राहून किंवा ऑनलाईन / डिजीटल किंवा ऑफलाईन पध्दतीने शिक्षण घेण्याच्या सुचना दिलेल्या आहेत.त्यामध्ये विद्यार्थ्यांची प्रत्यक्षातील उपस्थिती शिथील करण्यात आलेली आहे.ही बाब विचारात घेऊन सन 2020-21 या वर्षात मॅट्रिकपुर्व शिक्षण घेत असलेल्या पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती / फ्रिशिप ची अनुज्ञेय रक्कम मंजूर करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करुन सदर रक्कम पुढील आदेश होईपर्यंत लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर जमा करणे बाबत तथा जोपर्यंत सदर योजना महाडिबीटी प्रणालीवर कार्यान्वित होत नाहीत, तोपर्यंत सदरील योजनेचा लाभ ऑफलाईन पध्दतीने अदा होणे अपेक्षित असल्याचे संदर्भ पत्रात नमुद केलेले आहे.

या योजनेचे प्रस्ताव ऑफलाईन पध्दतीने स्विकृत करावयाचे असल्याने, त्याकरीता प्रस्ताव सादर करण्यासाठीच्या विहीत प्रपत्रात एकवाक्याता येण्यासाठी आयुक्तालयस्तरावरुन प्रपत्र तयार करुन यापुर्वीच देण्यात आलेले आहेत. मॅट्रिकपुर्व सर्व योजनेकरीता सादर करावयाच्या माहीतीमध्ये विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक, आधार संलग्न बँक खात्याची माहिती सादर करणे बंधनकारक असुन मंजूर शिष्यवृत्तीच्या रक्कमा त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावरच जमा करण्यात येत आहेत.

या कार्यालयामार्फत भारत सरकार मॅट्रिकपुर्व शिष्यवृत्ती, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, अस्वच्छ व्यावसायातील पालकांच्या मुलांना शिष्यवृत्ती, औद्योगिक प्रशिक्षणसंस्थेतील विद्यार्थ्यांना विद्यावेतन, माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती व इ. 10 वी तील विद्यार्थ्यांना परिक्षा फी माफी योजना ची अंमलबजावणी करण्यात येत आहे.  या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती,विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उपरोक्त योजनांचा लाभ देण्यात येतो. सन 2019-20 पासून इतर मागास वर्ग तसेच विजाभज प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती व भारत सरकार मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना सुरु करण्यात आलेल्या आहेत.

या शिष्यवृत्तीचे उद्दिष्टे हे विद्यार्थ्यांचे गळतीचे प्रमाण कमी करणे, गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे तथा गरजू विद्यार्थ्यांना लेखन व शैक्षणिक वाचन साहित्य खरेदी करणे शक्य व्हावे हे आहे. सन 2019-20  मध्ये या कार्यालयामार्फत 44 हजार 373 विद्यार्थ्यांना रु. 394.147  लक्ष इतके वाटप करण्यात आलेले आहे.

उपरोक्त सर्व योजनाचे प्रस्ताव विहीत प्रपत्रात योजनेच्या अटीस व शर्तीस आधीन राहून मुख्यध्यापकाच्या स्वाक्षरी सह तथा गटशिक्षण अधिकारी यांचे प्रतिस्वक्षरीसह Hard      व Soft Copy सह दिनांक 30 जानेवारी 2021 पर्यंत तयार करुन तालूकास्तरावर गटशिक्षण अधिकारी कार्यालयात सादर करावयाची आहे.  Soft Copy तील माहिती अचुकरित्या संकलनाकरीता सीडी CD मध्ये सादर करण्याबाबत सुचित करण्यात येत असून CD वर संबंधित शाळेचे नाव अचुकपणे नमूद करण्याबाबत कळविण्यात यावे. कोव्हीड-19 मुळे प्रस्ताव  संकलनास उशिर झाल्याने याबाबत कोणतेही कालमर्यादा वाढ करण्यात येणार नाही याची गांभिर्यांने नोंद घ्यावी. शिष्यवृत्ती प्रस्ताव सादर करताना एकही पात्र विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून  वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी.

दिनांक 30 जानेवारी 2021 पुर्वी  सर्व मुख्याध्यापक, जि.प. प्रशाला, जि.प.कन्या प्रशाला, जि.प.केद्रिय प्रा.शा. सर्व शासनमान्य खाजगी अनुदानित/ विनाअनुदानित प्राथमिक/ माध्यमिक शाळा यांनी अचूक परिपूर्ण माहिती विहीत प्रपत्रात गटशिक्षण कार्यालयात सादर करण्याचे आवाहन समाज कल्याण सभापती रोहिदास वाघमारे, समाज कल्याण अधिकारी सुनिल खमितकर यांनी केलेले आहे.

Post a Comment

0 Comments