विशेष घटक योजनेंतर्गत दुधाळ जनावरे/शेळी गट साठी अर्ज करावेत
लातूर:(जिमाका) दि.20 - सन 2020-21 या आर्थिक वर्षासाठी विशेष घटक योजनेअंतर्गत दोन दुधाळ जनावरे (गाय/ म्हैस) व 10+1 शेळी गट याचे पशुसंवर्धन विभाग जिल्हा परीषद लातूर कडून वाटप करण्यात येणार आहे. जिल्हयातील 10 ही तालुक्यातून या योजनेसाठी अनुसूचित जातीच्या अर्जदाराकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्जाचा नमुना व आवश्यक कागदपत्रे संबंधित तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी (वि)पं.स./ किंवा नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याकडून उपलब्ध् करुन घ्याावेत.
पुर्णपणे भरलेले विहित नमुण्यातील अर्ज दि. 23 जानेवारी 2021 ते 22 फेब्रुवारी 2021 या कालावधीत संबंधित पशुवैद्यकीय दवाखान्यात जमा करावेत. लाभार्थींची निवड पात्र अर्जामधून सोडत पध्दतीने करण्यात येणार आहे. त्यामुळे 22 फेब्रुवारी 2021 नंतर प्राप्त होणाऱ्या किंवा अपुर्ण अर्जाचा निवडीच्या सोडतीसाठी विचार केला जाणार नाही. तरी जास्तीत जास्त संख्येने लातूर जिल्हयातील अनुसूचित जातीच्या व्यक्तींनी अर्ज करावेत असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. आर. डी. पडील यांनी केले आहे.

0 Comments