Latest News

6/recent/ticker-posts

चांगल्या कामामुळे गोविंद जाधव यांना चौथ्यांदां पाणीपुरवठा सभापती, मुजाहिद शेख यांचे चांगले काम असूनही डच्चु

चांगल्या कामामुळे गोविंद जाधव यांना चौथ्यांदां पाणीपुरवठा सभापती, मुजाहिद शेख यांचे चांगले काम असूनही डच्चु


लातूर:(जिल्हा प्रतिनिधी/बी जी शेख)दि. २१ - औसा नगरपालिकेची विषय समिती व स्थायी समिती ची निवड ता.२० रोजी करण्यात आली. औसा रेणापुर चे उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यात गोविंद जाधव यांना त्यांच्या चांगल्या कामामुळे चौथ्यांदा पाणीपुरवठा सभापती मिळाले. तर शहराला स्वच्छते मध्ये अग्रेसर ठेवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणाऱ्या व तशा पद्धतीचे काम करणाऱे मुजाहिद शेख यांच्या वाढत्या प्रभावामुळे डच्चू देण्यात आल्याची चर्चा शहरांमध्ये आहे. १२.३० ला निवड घोषित करण्यात आली ज्यामध्ये कीर्ती कांबळे यांना बांधकाम सभापती, मेहराज शेख स्वच्छता सभापती, गोविंद जाधव यांना पाणीपुरवठा सभापती, नियोजन व विकास सभापती म्हणून उन्मेष वागधरे, महिला व बाल कल्याण सभापती म्हणून लक्ष्मीबाई माळी, शिक्षण क्रीडा व संस्कृतीक सभापती म्हणून अलिशेर कुरेशी यांची निवड करण्यात आली. शहरात या निवडीचे स्वागत होत असले तरी ज्याप्रमाणे गोविंद जाधव यांच्या कामाकडे पाहून त्यांना पाणीपुरवठा सभापती चौथ्यांदा दिले तसे मुजाहिद शेख यांनांही त्यांच्या कामा चा विचार करून तोच विभाग दिला गेला पाहिजे होता अशी शहरात चर्चा आहे. सोशल इंजिनिअरिंग प्रमाणे पालिकेतही सोशल इंजीनियरिंग झाल्याचे बोलले जात आहे. या निवडीमध्ये भाजपा पक्षाचे उमेदवार असल्याने राष्ट्रवादीची छुपी युती तर नाही ना ?अशी शंकाही व्यक्त केली जात आहे. या निवडीविषयी मुजाहेद शेख यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की पक्षश्रेष्ठींचा आदेश आहे त्याचे पालन करणे आवश्यक आहे. जनतेचे प्रेम माझ्या सोबत आहे हे माझ्यासाठी पदापेक्षा मोठी गोष्ट आहे ."अशी प्रतिक्रिया दिली.

Post a Comment

0 Comments