Latest News

6/recent/ticker-posts

उधळला गुलाल, वाजला विजयाचा ढोल-ताशा, तरुण गावकारभा-याकडुन आता वाढल्या विकासाच्या आशा

उधळला गुलाल, वाजला विजयाचा ढोल-ताशा,  तरुण गावकारभा-याकडुन आता वाढल्या विकासाच्या आशा 


{बाबुराव आगलावे

     औसा तालुक्यातील भादा ग्रामपंचायतचा निकालही लागला आणी  विजयी उमेदवारांनी विजयाचा आनंदोत्सवही साजरा केला . पण या निकालानंतर  आता गावच्या कारभारात तरुणाईचा वाटा महत्वाचा ठरणार असुन   हम भी है जोश मे म्हणत अनेक तरुणांनी  गावच्या कारभारात प्रथमच   हम होंगे कामयाब म्हणत दणदणीत विजय प्राप्त केला आहे. यामुळे गावचा कारभार करताना या तरुणांचे योगदान महत्वाचे ठरणार असल्याने गावातील  युवकांच्या विकासाच्या बाबतीत आता आशा पल्लवीत झाल्या आहेत.   गेल्या दोन टर्मला यशस्वी गावगाडा चालवल्यानंतर तिस-यांदा  पँनल उभा करतानाच  बालाजी शिंदे यांनी आपल्या पँनल मध्ये अनेक तरुणांना  समाविष्ठ करुण घेतले  त्यात त्यांना विजयश्री ही मिळाली व  विरोधी पँनलमधुन अमोल रामेश्वर पाटील या तरुणांने  मला   भी जमतय कि म्हणत यश मिळवलेच ! अशा पद्धतीने निवडुण आलेल्या या गावकारभा-यात अनेक तरुण  आहेत त्यामुळे गावातील युवकांच्या आशा आता पल्लवीत झाल्या आहेत . यात सर्व प्रथम कारभार हाती घेतल्यानंतर  गावातील विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका सुरू करणार असुन यातुनच येथेच स्पर्धा परिक्षेसाठी विद्याथ्यर्थी घडविण्यास प्राधान्य दिल जाईल  व गावच्या विकास कामात कुठलही राजकारण केलं जाणार नाही अशी आपली स्पष्ट भुमिका आज गावक-यापुढे सत्काराला उत्तर देताना नुतन सदस्य अमोल पाटील यांनी  मांडली. 

    


आपल्या ही गावात स्पर्धा परिक्षेसाठी तयारीचे वर्ग चालु व्हावेत , गावातील तरुणांना खेळासाठी मैदानाची सोय व्हावी  अशा अपेक्षा गावातील तरुणांच्या असुन गावातील सुशिक्षीत बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळावे अशा  युवकांच्या अपेक्षा आहेत.   गावचे तरुण कारभारी युवकांसाठी काय काय करतील हिच उत्सुकता सर्वांना आहे.

Post a Comment

0 Comments