Latest News

6/recent/ticker-posts

एक धागा नात्याचा... "गंगा जमुना संस्कृती"

 एक धागा नात्याचा...

"गंगा जमुना संस्कृती"


मा
णसाच्या आयुष्यात नाती ही फक्त रक्ताचीच असतात अशी नाही तर  मानलेली आणी मनातुन जन्मलेली नाती ही आयुष्याच्या प्रवासात  माणसाचा श्वास निश्वास होईर्यंत सावली सारखी साथ देतात. मग ती जाती धर्माची सिमा ओलांडुन अंत:करणातुन अंतकरणात कायमचीच घर करुन रहातात. आणी अशी नाती हि माणसाच्या आयुष्यात  सुख-दु:खातही  सोबतच असतात. नाते रक्ताचे असो की मानलेले ते असणे जितके महत्त्वाचे असते त्यापेक्षा नाते जपणे हेच जास्त महत्वाचे असते. आणि नाते जपतांना एकमेकांच्या विचारांचा आदर करणे अधिक महत्वाचे

"गंगा जमुना संस्कृती" म्हणून भारतीय सांस्कृतीक एकतेची ओळख आणि परंपरा आहे आणि आपण त्या संस्कृतीचे वारसदार आहोत...ईद...दिवाळी.. रंगपंचमी कींवा इतर बरेच सण आपण एकत्रित साजरे करत असु ... लग्नकार्य... गृहप्रवेश आणि इतर सुख दुःखात रक्ताच्या नात्या एवढेच महत्त्व मानलेल्या नात्यांनाही देतो हि सुंदरता फक्त भारतीय संस्कृतीतच दिसते. संस्कृतीक एकतेचाच एक भाग... संक्रांत हा एक सण... त्यानिमित्ताने हळदी कुंकुवासाठी महिलांचे एकमेकींना आमंत्रण ही परपंरा... आणि मानलेल्या नात्यांनाही तोच मान ही संस्कृती... त्या संस्कृतीचा आम्ही एक भाग आहोत याचा आम्हांला आनंद आणि अभिमान आहे. दर वर्षी हळदी कुंकवाच्या घरगुती कार्यक्रमासाठी आमची मोठी गुरु बहीण सौ मनिषा ताई तावरे आवर्जून निमंत्रीत करतात... आणि माझी पत्नी डाॕ.सौ.रीजवाना शेख या दर वर्षी आवर्जून उपस्थित राहुन शुभेच्छा देतात. अशीच दिवाळी... आणि आमच्याकडे ईद साजरी होते. हा सांस्कृतिक एकतेचा वारसा आणि स्नेह असाच जपला जातो. 

!! मजहब नही सिखाता आपस मे बैर रखना !! इतर धार्मिक संस्कृतीचा सन्मान हिच प्रत्येक धर्माची शिकवण आणि हिच खरी भारतीय संस्कृती आणि जबाबदारी सुध्दा 

एक धागा नात्याचा...

जसे दवबिंदुसंगे तृण पात्याचा  

राग,मत्सर मोडणारा,अंत: करणाला,अंत: करणाशी जोडणारा


डॉ. नदीम शेख,आष्टी

Post a Comment

0 Comments