Latest News

6/recent/ticker-posts

वनशेती उपअभियान अंतर्गत अनुसुचीत जाती प्रवर्गामधील शेतकऱ्यानी प्रस्ताव सादर करावेत

वनशेती उपअभियान अंतर्गत अनुसुचीत जाती प्रवर्गामधील शेतकऱ्यानी प्रस्ताव सादर करावेत 


लातूर:(जिमाका) दि.21 - वातावरणातील बदलामुळे शेती क्षेत्रावर होणारे दुष्परीणाम कमी व्हावेत या साठी केंद्र शासनाने वनशेती  विषयक घोरण 2014 मध्ये लागु केले आहे शेतीपिकाना पुरक म्हणुन शेतावर वृक्ष लागवडीखालील क्षेत्र वाढवणे या उददेशाने  ही योजना सुरु केलेली  आहे.

या योजनेमधुन शेतकऱ्याच्या शेतावर स्थाणिक वणवृक्षाच्या लागवडीस  प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येते . सन 2020-21 मध्ये अनुसुचीत जाती प्रवर्गामधील ज्या शेतकऱ्यानी  शेतावर वनवृक्षाच्या रोपाची लागवड केलेली आहे अथवा करण्यासाठी ईच्छुक आहेत अशा शेतकऱ्यानी  संबधीत कृषि सहाय्य्क , कृषि पर्यवेक्षक , मंडळ कृषि अधिकारी   अथवा  तालुका कृषि अधिकारी कार्यालयाकडे दि 27 जानेवारी 2021 पुर्वी संपर्क साधावा  योजनेमधुन सलग शेतावरील लागवडीस  प्रती हे रोपाच्या संख्येनुसार रु 3500 ते 25000 या प्रमाणे  अनुदान देय आहे सदरचे  देय अनुदान हे चार वर्षामध्ये 40:20:20:20 या प्रमाणात आहे.योजनेच्या अधिक माहितीसठी संबधीत तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क करावा.

Post a Comment

0 Comments