राष्ट्रीय महामार्ग 361 चौपदरीकरणाचे काम लवकरच सुरु होणार- सुनिल पाटील,प्रकल्प संचालक राष्ट्रीय महामार्ग
29 जानेवारी पासुन प्रत्यक्ष कामा होणार सुरुवात,50 वर्ष तरी रस्त्याला कांही होणार नाही.याची खबरदारी घेतली जात आहे.188 किलोमीटरच्या या रस्त्यावर लातुर ते चाकुर अहमदपुर ते लोहा,नांदेड ते वारंगाफाटा दरम्यान 3 टोलनाके राहणार आहेत.
सुनिल पाटील,राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प संचालक
चाकुर:(ता.प्र.सलीमभाई तांबोळी) औसा नांदेड ते वारंगाफाटा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम लवकरच सुरु होणार अशी माहिती सुनिल पाटील यांनी दिली. रत्नागिरी ते नागपुर रस्त्यावरील औसा ते वारंगाफाटा हा रस्ता राष्ट्रीय महामार्गाकडे स्थालांतरीत झाला असुन यास 361 क्रमांक देण्यात आला आहे. औसा-लातुर-चाकुर-अहमदपुर-लोहा-नांदेड ते वारंगाफाटा या 361 क्रमांकाचे राष्ट्रीय महामार्गाचे काम मागील अनेक वर्षापासुन प्रलंबित होते.आता ते काम ते काम 29 जानेवारी पासुन सुरु होणार आहे. तसेच या रस्त्यावरील खड्डेही तातडीने बुजवले जाणार असल्याची. माहिती राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक सुनिल पाटील यांनी दिलीआहे.चापोली ता.चाकुर राष्ट्रीय महामार्गाची बुधवारी त्यांनी पाहणी केली. रत्नागिरी ते नागपुर रस्त्यारील औसा ते वारंगाफाटा हा रस्ता राष्ट्रीय महामार्गाकडे स्थालांतरीत झाला असुन यास 361 क्रमांक देण्यात आला आहे. रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी शेतकऱ्यांच्या जमीन संपादीत करण्यात आली असुन या संपादीत जमीनीचा मावेजा कांही शेतकऱ्यांना मावेजा देण्यात आलेला आहे.या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम मागील दोन वर्षापुर्वी सुरु झाले होते. परंतु काही दिवसानंतर काम बंद करण्यात आले होते. या रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडले असुन ते बुजविण्याकडेही दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे अपघाताचे प्रमान वाढले आहे.वाहन चालकांना मोठा ञास सहन करावा लागत आहे.रस्त्यावरील खड्डे बुजवावेत या मागणीसाठी वेगवेगळ्या मार्गाने आंदोलन करण्यात आले.तसेच रस्त्याचे काम तातडीने सुरु करण्याची मागणी करण्यात आली होती. राष्ट्रीय माहामार्ग प्रकल्प संचालक सुनिल पाटील यांनी सदरील रस्त्याची पाहणी केली. पुर्वीच्या कंञाटदाराकडील काम रद्द करण्यात आले असुन नवीन कंञाटदाराकडुन 29 जानेवारी रस्त्याचे काम काम प्रत्यक्षात सुरु केले जाणार आहे.
188 किलोमीटरच्या या रस्त्यावर लातुर-ते चाकुर,अहमदपुर ते लोहा,नांदेड ते वारंगाफाटा दरम्यान 3 टोलनाके राहणार आहेत. रस्त्याच्या सुरक्षितततेच्या दृष्टिकोणातून काम केले जाणार असुन 50 वर्ष तरी रस्त्याला कांही होणार नाही याची खबरदारी घेतली जाणार आहे. लातुररोड येथील रेल्वे पुल,मांजरा नदीवरील पुलासह इतर ठिकाणच्या पुलाचे कामही तातडीने सुरु होणार असुन. दोन वर्षाच्या आत रस्त्याचे काम पुर्ण करण्याचा राष्ट्रीय महामार्गाचे प्रयत्न असल्याचे सुनिल पाटील यांनी सांगितले.लातुर चाकुर दरम्यानचे खड्डे बुजविण्यात आले आहेत. लोहा ते चापोली पर्यंतचे काम ही चार दिवसात पुर्ण होणार आसल्याची माहिती त्यांनी दिली.

0 Comments