Latest News

6/recent/ticker-posts

टीचभर पोटासाठी ऊसतोड कामगारांची जीवघेणी कसरत

टीचभर पोटासाठी ऊसतोड कामगारांची जीवघेणी कसरत


औसा:(तालुका प्रतिनिधी/बी डी उबाळे) दि.२२ - आपला देश भारत या कृषिप्रधान देशात 70 टक्के नागरीकांची शेतीवर उपजीविका आधारित आहे. सर्व कारखान्यांना कच्चामालही शेतातून जातो. परंतु कृषिप्रधान देशात पोटाची खळगी भरण्यासाठी शेतमजुरांचे हाल मोठ्या प्रमाणात गैरसोय झाल्याने होत आहेत. ऊसतोड कामगारांच्या टीचभर पोटाची खळगी भरून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवण्यासाठी सुरू असलेली जीवघेणी कसरत मात्र दखल घेण्यासारखी असते. ऊसतोड कामगार नोंव्हेंबर पासूनच घरदार सोडून बैलगाडीसह कुटुंब सोबत घेऊन थंडीवाऱ्यात काम करतात. ऊन, वारा,साप,पाऊस घनदाट वन रानं, जंगल याची पर्वा न करता बैल बारदाना घेऊन ऊसतोड कामगार अपार कष्ट करतात. सध्या साखर कारखाने सुरू असून 10  ते 15 किलोमीटर अंतराच्या आतील उसाची तोडणी व वाहतूक बैलगाडी च्या साह्याने केली जाते. परंतु ऐन हिवाळ्यात कडाक्याची थंडी असतानासुद्धा ऊसतोड कामगारांना दिवस रात्र जागून रात्री,अपरात्री,अंधारात जीवनाची पर्वा न करता काम करावे लागते. पालाच्या झोपड्या करून कुटुंबासह ऊसाच्या फडावर जीवन कंठावे लागते. पोटाची खळगी भरण्यासाठी जीवन जगण्याचा संघर्ष करीत ऊसतोड कामगारांना नैसर्गिक संकटाच्या सामना करीत ऊसतोड कामगारांची पोटाची खळगी भरण्यासाठी कसरत करावी लागत आहे. 

एकीकडे कितीही मेहनत केली तरी पोट भरत नाही अशी पोट भरणाऱ्यांची संख्या असंख्य असूनअशा पोट भरण्यासाठी दाही दिशा फिरणाऱ्या नागरिकांना शासनाकडून भरीव मदत होणे आवश्यक आहे.

Post a Comment

0 Comments