कारभारी बदलले तस्सं या रस्त्यांचं रुप बदलणार का ?
बाबुराव आगलावे
नुकत्याच झालेल्या औसा तालुक्यातील भादा ग्रामपंचायतच्या निवडणुकीत मतदारांनी विकासाच्या कामावर भरोसा ठेवुन अनेक तरुण चेह-यांना गावचा कारभार करण्याची संधी दिली . मात्र गावातील अनेक रस्त्यावर सांडपाणी वाहत असल्याने या रस्त्याचेही रुप कधी बदलेलं ? हि उत्सुकता आता मतदारात लागली आहे.
भाद्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत विकासाच्या मुद्द्यावर अनेक नव तरुणांना मतदारांनी संधी दिली. त्यामुळे विकासाच्या बाबतीत गावक-याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. मात्र गावातील काही भागात गटाराच्या सांडपाण्याची व्यवस्था झाली नसल्याने किंवा त्याचे योग्य नियोजन केले नसल्याने गावातील काही रस्त्यावर गटाराचे सांडपाणी भर रस्त्यावरुणच वाहते. याचा त्रास संबंधीत भागातील नागरीकांना होत असुन नविन गावकारभा-याकडुन नागरीकांसाठी स्वच्छ व वेळेवर पिण्याचे पाणी , रस्त्यावर विज , या सुविधा मिळण्याची आशा आहे. आजही गावातील काही भागात खांबावर बल्ब नाहीत. त्या संबंधीत भागात नागरीकांना साईटची व्यवस्था हे नविन कारभारी करतील अशी आशा नागरीकांना आहे.
गावातील या सांडपाण्याच्या बाबतीत नुतन सदस्य अमोल पाटील यांना विचारले असता ते म्हणाले कि , गावातील काही भागात शोषखंड्ड्याचे कामं व्यवस्थीत झाली नसल्याने त्या शोषखड्ड्यात पाणी न मुरता रस्त्यावरती येत आहे. या बाबतीत मी स्वत: लक्ष घालुन त्याचे नियोजन करणार आहे .

0 Comments