जमाअत ए इस्लामी हिंदच्या वतीने अंधारातून प्रकाशाकडे राज्यव्यापी अभियान
लातुर:(प्रतिनिधी) कोरोनाचा महामारी मध्ये फिजिकल डिस्टन चे पालन करत राज्यव्यापी अभियान अंधारातून प्रकाशाकडे हे आज दिनांक 22 ते 31 जानेवारी यादरम्यान मोठ्या शहरात राबविण्यात येणार असून समाजामध्ये पसरलेले घनघोर अंधार कसा दूर करता येईल आणि त्यांचे उज्वल वर्तमान व भविष्य यामध्ये प्रकाश तेजोमय कसा करता येईल यावर या अभियानामध्ये भर देण्यात येणार असल्याचे जमात-ए-इस्लामी हिंद लातूर शाखेचे संघटक सय्यद बिस्मा उद्दीन हाश्मी याने येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले या पत्रकार परिषदेस जमात ए इस्लामी हिंदचे शहराध्यक्ष एम आय शेख युवा आघाडीचे शहराध्यक्ष साजिद खान किशन पाटील अश्फाक अहमद शेख मुजीब देवणीकर साजिद आजाद जुनेद अकबर आदींसह संघटनेचे विविध पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

0 Comments