Latest News

6/recent/ticker-posts

चाकूर तालुक्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही- खा.सुधाकर श्रृंगारे

चाकूर तालुक्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही- खा.सुधाकर श्रृंगारे


चाकूर:(ता.प्र,सलीमभाई तांबोळी) तालुक्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही असे प्रतिपादन खा.सुधाकर श्रृंगारे यांनी मौजे अंबुलगा येथे आयोजीत ३५ लक्ष रुपये विविध विकास कामांच्या उद्घाटन व लोकार्पण कार्यक्रमाप्रसंगी केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मंञी विनायकराव पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून समाजकल्याण सभापती रोहिदास वाघमारे,मार्केट कमिटीचे माजी सभापती प्रशांत पाटील,माजी उपसभापती अशोक चिंते,तालुकाध्यक्ष शिवाजी बैनगीरे,पं स उपसभापती सज्जन लोणाळे,जि प सदस्य हर्षवर्धन कसबे,श्रीमंत शेळके,सिद्धेश्वर पवार,अनिल चव्हाण,खुदबोद्दीन घोरवाडे,रणजीत मिरकले,सरपंच सुंदर पाटील,अजय काळे,दयानंद पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी अष्ठा गाव व अंबुलगा येथे ३५ लक्ष रुपये विविध विकास कामाचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा खासदार सुधाकरराव श्रृंगारे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. पुढे बोलताना खा.श्रृंगारे चाकूर तालुक्यातील विविध प्रश्न मार्गी लागतील व कुठल्याच कामासाठी निधी कमी पडणार नसून केंद्रसरकारचा विकासनिधी ग्रामस्तरावर आणण्याचा आपला प्रयत्न असून येणाऱ्या काळात तालुक्यातील अनेक गावांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे म्हणाले. या कार्यक्रमाप्रसंगी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या प्रास्तविकेत गणेश सुर्यवंशी यांनी अंबुलगा गावक-यांच्या वतीने विकासकामांसाठी निधीची मागणी करीत गावात झालेल्या विविध विकास कामांची माहिती देऊन मान्यवरांचे आभार व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लक्ष्मण पाटील, दत्तराव रकटाटे, आबासाहेब पाटील, शिवाजी जाधव, गंगाधर जाधव, देविदास सुर्यवंशी, अंकुश शिंदे, बब्रुवान सुर्यवंशी, वाघबंर सुर्यवंशी, गणेश तेलंगे आदीनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments