Latest News

6/recent/ticker-posts

चाकुर तालुक्यातील सरपंच पदांचे आरक्षण जाहीर

चाकुर तालुक्यातील सरपंच पदांचे आरक्षण जाहीर 


चाकुर:(ता.प्र.सलीमभाई तांबोळी) चाकुर तालुक्यातील 71 ग्रामपंचायतीचे आरक्षण जाहीर करण्यात आले.2020 ते 2025 पर्यंत मुदत पुर्ण करणाऱ्या ग्रामपंचायती साठीचे आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली.नगरपंचायतीच्या सभागृहात अहमदपुरचे उपविभागीय अधिकारी प्रभोदय मुळे यांच्या उपस्थितीमध्ये सरपंच पदाचे आरक्षण काढण्यात आले.चाकुर तहसिलदार डॉ.शिवानंद बिडवे यांनी आरक्षण जाहीर केले.श्रध्दा संजय चापळे यामुलीच्या हाताने चिठ्ठी काढण्यात आली.यावेळी नायब तहसिलदार बालाजी चितळे,विस्तार अधिकारी एकनाथ बुआ,अगंद कासले,चाकुर सज्जा तलाठी नवनाथ खंदाडे,उपस्थित होते.

सरपंचपदाचे आरक्षण अनुसुचित जाती लातुररोड,मंहाडोळ,महाळंग्रा,महाळंगी,रोहिणा,शिवणी मंजरा,वडवळ [ना] अनुसुचित जाती महिला अजनसोंडा [खु], बनसावरगाव,बोळेगांव,घरणी,मोहनाळ,शिवणखेड,सुगाव,अनुसुचित जमाती हणमंत जवळगा,अनुसुचित जमाती महिला वडगाव एक्की,खुल्या प्रवर्गासाठी अजनसोंडा [बु],आटोळा,आनंदवाडी,आष्टा,जढाळा,जानवळ,बावलगांव,नांदगांव,बोरगांव [बु], नळेगांव,नागदरवाडी,शिरनाळ,बोथी,मष्णेरवाडी,मोहदळ,लिंबाडवाडी,वाघोली हिप्पळनेर,खुला प्रवर्ग महिला महाळग्रावाडी,कडमुळी,कबनसांगवी,कवटाळी,घारोळा,जगळपुर [खु],झरी [बु], टाकळगाव,तिवघाळ,झरी  [खु], नागेशवाडी,नायगांव,बम्हवाडी य,भाटसांगवी,राचन्नावाडी,रायवाडी,हाडोळी,हाळी [खु], नागरिकांच्या मागास प्रवर्ग कलकोटी,गांजुर,चापोली,तिर्थवाडी,देवंग्रा,बेलगाव,ब्रम्हवाडु व,मुरंबी, रामवाडु,डोंग्रज,नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आंबुलगा,अलगरवाडी,उजळंब,केंद्रेवाडी,गांजुरवाडी,तिवटघाळ, दापक्याळ,मांडुरकी,शेळगांव,या गावांच्या सरपंच पदाचे आरक्षण आरक्षीत झाले आहेत.

Post a Comment

0 Comments