दुभत्या जनावरांना खादय वैरणीचे बियाणे मोफत वाटप होणार
लातूर:(जिमाका) दि.29 - सन -2020-21 या आर्थिक वर्षासाठी दुभत्या जनावरांना खादय उपलब्धतेसाठी सुधारणा कार्यक्रमांतर्गत (सर्वसाधारण योजना) वैरणीचे 100 टक्के अनुदानावर बियाणे पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद, लातूर कडून वाटप करण्यात येणार आहे. जिल्हयातील सर्व तालुक्यातून या योजनेसाठी अर्जदाराकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्जाचा नमुना व आवश्यक कागदपत्रे संबंधित तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी (वि) पं.स/ किंवा नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याकडून उपलब्ध् करुन घ्यावेत.पुर्णपणे भरलेले विहित नमुण्यातील अर्ज दि. 1 फेब्रुवारी 2021 ते मार्च 2021 या कालावधीत संबंधित पशुवैद्यकीय दवाखान्यात जमा करावेत. लाभार्थ्यांची निवड पात्र अर्जामधुन सोडत पध्दतीने करण्यात येणार आहे. त्यामुळे 3 मार्च 2021 नंतर प्राप्त होणाऱ्या किंवा अपुर्ण अर्जाचा निवडीच्या सोडतीस विचार केला जाणार नाही. जास्तीत जास्त संख्येने लातूर जिल्हयातील सर्व जातीच्या व्यक्तींनी अर्ज करावेत असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परीषद डॉ.आर.डी.पडीले यांनी केले आहे.

0 Comments