अन्न प्रक्रिया उद्योगासाठी प्रस्ताव दाखल करण्याचे आवाहन
लातूर: (जिमाका) दि.29 - केंद्र पुरस्कृत आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत PMFME प्रधानमंत्री सुक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन ही योजना असंघटीत क्षेत्रातील अन्न प्रक्रिया उद्योगासाठी राबविली जाणार आहे. या योजने अंतर्गत केंद्र शासनाने लातूर जिल्हयासाठी एक जिल्हा एक उत्पादन (ODOP) या बाबीखाली टोमॅटो या पिकास मंजूरी दिलेली आहे. ही योजना सन 2020-21 ते 2024-25 या 5 वर्षात राबविली जाणार आहे
या योजने अंतर्गत लातूर जिल्हयातील शेतकरी उत्पादक संस्था (FPO), स्वयंसहाय्यता बचत गट (SHG), सहकारी उत्पादक यांना टोमॅटो प्रक्रिया उद्योगाकरीता लाभ घेता येणार आहे. जिल्हयासाठी 10 प्रक्रिया उद्योगाचे उद्यिष्ट असून यापैकी स्वयंसहाय्यता गटासाठी 9 तर शेतकरी उत्पादक कंपनी / सहकारी उत्पादक 1 उद्यिष्ट देण्यात आले आहे.
सदरील प्राप्त उद्यिष्टानूसार मुख्यत्वे सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना सक्षमीकरणासाठी खर्चाच्या 35 %, कॉमन फॅसिलिटी सेंटर, भांडवलासाठी खर्चाच्या 35 % व ब्रँन्डींग व मार्केटींगसाठी खर्चाच्या 50 % अनुदान दिले जाणार आहे. योजने अंतर्गत रु.10 लाख पर्यंतच्या प्रस्तावास राज्यस्तरीय समितीच्या मान्यतेने मंजूर केले जातील व रु.10 लाखा पेक्षा जास्तीचे प्रस्ताव केंद्र शासनाकडे मंजूरीसाठी पाठविलेे जातील. स्वयंसहाय्यता बचत गटांना खेळते भांडवल, सदस्यांना कर्ज किंवा गुंतवणूकी करीता प्रती बचत गट 4 लाख रुपयाचा लाभ दिला जाणार आहे.
या योजनेअंतर्गत FPO, SHG, सहकारी उत्पादक यांना अर्थसहाय्यासाठी सध्या कार्यरत उद्योगांस सहाय्य केले जाईल व अन्य कार्यरत उद्योग ज्यांची क्षमता आहे अशा उद्योगांना देखील सहाय्य केले जाईल. तसेच नवीन उद्योगांच्या बाबतीत जे उद्योग एक जिल्हा एक उत्पादन धोरणानूसार टोमॅटो पिकावर आधारीत आहेत त्यासाठीच सहाय्य करण्यात येईल तसेच सदर उद्योग बँक कर्जाशी निगडीत असून संस्थेची आर्थिक उलाढाल ही किमान रु.1 कोटी असणे बंधनकारक आहे. या योजने करीता सद्यस्थिातीत FPO, SHG, सहकारी उत्पादक यांच्या मार्फत ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
अधिक माहितीसाठी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, लातूर कार्यालयातील तंत्र सहाय्यक एम.एम. निटूरे मो.नं.9422750401 यांच्याशी संपर्क करावा/ www.krishi.maharashtra. gov.in या संकेत स्थळाला भेट द्यावी. तसेच जिल्हयातील शेतकरी उत्पादक संस्था/शेतकरी उत्पादक कंपनी/स्वयंसहाय्यता गट/ सहकारी उत्पादक यांनी ऑफलाईन पध्दतीने अन्न प्रक्रिया उद्योगासाठीचे जास्तीत जास्त प्रस्ताव जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी,कार्यालयात दाखल करण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, डी.एस.गावसाने यांनी केले आहे.

0 Comments