उप अभियंत्यांनी केली घनकचरा,सांडपाणी व्यवस्थापनाची पाहणी; भादा येथे साकारणार घनकचरा व्यवस्थापन प्लांट
औसा:(तालुका प्रतिनिधी/बी डी उबाळे)दि.२९ - औसा तालुक्यातील भादा येथे शुक्रवार दिनांक २९ जानेवारी २०२१ रोजी दुपारी उपअभियंता कसबे सर यांनी घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनाची गावांमध्ये फिरून पाहणी करण्यात आली. यावेळी उपअभियंता यांनी औसा औसा यांनी औसा काही मोजक्याच गावांमध्ये घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन ही सुविधा आणि योजना गावांमध्ये राबवण्यात राबवण्यात राबवण्यात येणार असल्याची माहिती दिली.तर गावामध्ये निर्माण होणारा टाकाऊ कचरा हा कचरा गावामध्ये रस्त्याच्या दुतर्फा टाकल्याने गावात वाऱ्यामुळे घाण निर्माण होते अशी घाण निर्माण होऊ नये यासाठी गावाबाहेर एक मोठा खड्डा तयार करून यामध्येच सर्व गावातील कचरा एकत्रीत करून तो त्या खड्यात साठवून त्यापासून खत निर्मिती करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.यासाठी निधीची तरतूद आणि त्या कामाचे पूरक असा भरीव निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे समजते. यावेळी जयंत जाधव प्रशासक तथा उप अभियंता बांधकाम, कसबे सर उपविभागीय अधिकारी (ल. पा.) माणिक सूर्यवंशी ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत कर्मचारी नंदकुमार फरताळे, शिवाजी बनसोडे,भ्रमनंद स्वामी इ. उपस्थित होते.

0 Comments