Latest News

6/recent/ticker-posts

सोयाबीनची बनीम जाळली दोन लाख रुपयाचे नुकसान

सोयाबीनची बनीम जाळली दोन लाख रुपयाचे नुकसान


शिरूरअनंतपाळ:{प्रशांत तांबोळकर} तालुक्यातील मौ. येरोळ येथील शेतकरी गुंडेराव यशवंतराव सिंदाळकर यांच्या शेतातील सोयाबीनची बनीम अज्ञात व्यक्तीने पेटवुन दिली. यामध्ये अंदाजे दोन लाख रूपयाचे नुकसान झाले. अगोदरच परतीच्या पावसाने झालेले नुकसान केलेला खर्च व उत्पादन कमी झाल्याने शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबत असुन आत्महत्यासारखे पाऊल उचलत आहेत. गुंडेराव सिंदाळकर या शेतकर्‍यांनी सर्व्हे नंबर ५८ मध्ये सोयाबीनची बनीम ठेवली होती. घराचे बांधकाम चालु असल्याने व घरी माल ठेवण्यास जागा नसल्याने तुर आणि सोयाबीनची रास एकञ करुण आणावी म्हणुन  शेतातच बनीम घालुण ठेवली होती. परंतु अज्ञात इसमाने रविवारच्या राञी सोयाबीनची बनीम पेटवुन दिल्याने सुमारे दोन लाख रूपयाचे नुकसान झाले आहे .

Post a Comment

0 Comments